शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढूनही रहदारीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:32 IST

आता पुन्हा रस्त्यालगत सार्वजनिक जागेवर शीतपेयांची दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबादचा शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगचा प्रश्न कायम ऐरणीवर येत आहे. वर्षभरापूर्वीच शहरातील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यातच आता पुन्हा रस्त्यालगत सार्वजनिक जागेवर शीतपेयांची दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी होत आहे. आठवडी बाजाराचा दिवस असला की रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. वाहनधारकही पार्कींग झोन नसल्यामुळे आपल्या सोयीनुसार गाड्या उभ्या करीत आहे.जाफराबाद शहरात सार्वजनिक रस्त्यावर अवैध व्यवसाय सुरू आहे. येथील व्यावसायिकांनी आपल्या मालकीची जागा सांगून रस्त्यावर शितपेय, टी -हाऊस, पानटपरी उभारून अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. काहींनी इतर परप्रांतीयांना भाड्याने देऊन व्यवसाय सुरू केला आहे. याकडे नगर पंचायत, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे सध्या शहरात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने वर्षभरापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळे शहरातील रस्ते मोकळे झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा शहरातील पार्कींगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात पार्कींग झोन तयार करण्याची मागणी शाम भाग्यवंत यांनी केली आहे.शहरातील अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी चौक, जालना रोड, बसस्थानक रोड व्यावसायिकांनी रस्त्यावर साहित्य ठेवून व्यापून घेतला आहे. त्यात अवैध वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी मोठी आहे. भरधाव वेगात वाहने चालवून जाफराबादकरांच्या जिवाशी खेळ करीत आहे.दुकानात येणा-या ग्राहकांसाठी गाडी पार्किंग सुविधा नसल्याने आपल्या सोयीनुसार ते रस्त्यावरच मिळेल त्या ठिकाणी गाडी लावून रहदारीस अडथळा निर्माण करीत आहे. नगर पंचायत, पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणroad transportरस्ते वाहतूकMarketबाजार