शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांचे नातेवाईक ओढतात ‘स्ट्रेचर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:01 IST

नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागते. असेच चित्र बुधवारी दुपारी जिल्हा रूग्णालयात दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वेदनेने विव्हळणारे अनेक रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, रूग्णवाहिकेतून येणाऱ्या रूग्णांना स्ट्रेचरद्वारे डॉक्टरांकडे नेण्याची जबाबदारी काही वेळा कर्मचारी पार पाडत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागते. असेच चित्र बुधवारी दुपारी जिल्हा रूग्णालयात दिसून आले.अपघात, मारहाणीतील जखमींसह विविध आजारांनी ग्रासलेले शेकडो रूग्ण जिल्हा रूग्णालयात दैनंदिन उपचारासाठी येतात. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाºया रूग्णांना अतिदक्षता विभागात नेण्यात येते. मात्र, रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर १०८ रूग्णवाहिकेतून रूग्ण आला तरी कर्मचारी स्ट्रेचर घेऊन जात नसल्याचे चित्र आहे. बुधवारी दुपारी १.४१ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकार जिल्हा रूग्णालयात दिसून आला. एका जखमी रूग्णाला रूग्णवाहिकेतून (क्र.एम.एच.१४- सी.एल.११३५) उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. १०८ रूग्णवाहिका आली म्हटलं की, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर घेऊन रूग्णाला अतिदक्षता विभागात नेण्यासाठी पुढं येणे अपेक्षित आहे. मात्र, कोणी कर्मचारी संबंधित रूग्णाला घ्यायला पुढे आला नाही. त्यानंतर जखमीच्या एका नातेवाईकानेच स्ट्रेचर बाहेर आणले. रूग्णवाहिकेतून बाहेर पडण्यासाठी रूग्णाला साधारणत: सात ते आठ मिनिटे लागली. तोपर्यंत स्ट्रेचर उन्हाने तापून गरम झाले होते. रूग्णाने स्ट्रेचवर हात ठेवला आणि ते पोळू लागले. त्यामुहे तो स्ट्रेचवर एका बाजूला बसून राहिला. मात्र, १०८ च्या कर्मचाºयाने ‘स्ट्रेचर पडेल, तुम्ही झोपा’ असा सल्ला दिला. मात्र, स्ट्रेचवर बेडशिट नसल्याने व ते पोळू लागल्याने रूग्णाने त्यावर झोपण्यास नकार दिला. तेथे उपस्थित एका वयोवृध्द महिलेने हातातील ओढणी स्ट्रेचवर टाकल्यानंतर तो रूग्ण स्ट्रेचरवर झोपला. नातेवाईकांची कसरत पाहून १०८ च्या कर्मचा-यानेच स्ट्रेचर ओढण्यासाठी नातेवाईकांना मदत केली आणि रूग्णाला अतिदक्षता विभागात दाखल केले.सलाईनची बाटली नातेवाईकांच्या हातातसंबंधित रूग्णाला रूग्णवाहिकेतून खाली उतरण्यासाठी साधारणत: आठ मिनिटे लागली. त्यानंतर नातेवाईकांनीच स्ट्रेचर आणले. विशेष म्हणजे, रूग्णवाहिकेतून रूग्ण खाली उतारल्यापासून तो रूग्ण अतिदक्षता विभागात जाईपर्यंत महिला नातेवाईकाला सलाईनची बाटली हातात धरून ठेवावी लागली.सततच घडतात असे प्रकारउपस्थित काही नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. रूग्णालयात अनेकवेळा असे प्रकार घडत आहेत.रूग्ण वेदनेने व्हिळत असतो आणि कर्मचारी त्याला घेण्यासाठी स्ट्रेचर आणत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागत असल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय