शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणीचे सर्व्हर जळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:49 IST

नॅशनल कोलेटर सर्व्हिसेस लिमीटेड (एन.सी.एम.एल) या मुंबई स्थित कंपनीचे आॅनलाईनचे सर्व्हरजळाल्याने तूर, हरभरा आदी शेतमालाचे आॅनलाईन नोंदणी तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नॅशनल कोलेटर सर्व्हिसेस लिमीटेड (एन.सी.एम.एल) या मुंबई स्थित कंपनीचे आॅनलाईनचे सर्व्हरजळाल्याने तूर, हरभरा आदी शेतमालाचे आॅनलाईन नोंदणी तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.हमीभावाने शेतमाल खरेदी करतांना पादर्शकता यावी यासाठी नाफेडने नॅशनल कोलेटरल सर्व्हिसेस या कंपनीकडे हमीभावाने आॅनलाईन नोंदणीसह, खरेदी विक्री आणि शेतक-यांच्या देयकाबाबत हिशोब ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र या कंपनीचे १६ एप्रिल रोजी सर्व्हर जळाल्याने राज्यातील हमीभावाने आॅनलाईन नोंदीसह शेतमाला खरेदीला बे्रक लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. खरेदीबाबत शेतकºयांना पाठविण्यात येणारे मेसेज बंद झाल्याने नोंदणीकृत शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारून याबाबत विचारणा करीत आहेत.विशेष म्हणजे राज्यभरात हमीभावाने तूर नोंदणी बंद करण्याचे आदेश नाफेडकडून राज्यातील जिल्हामार्र्केटींग विभागाला दिले आहेत. यामुळे आॅनलाईन नोंदणीसाठी शेतक-याकडे दोनच दिवस उरले असतांना नोंदणीची आॅनलाईन प्रक्रिया बंद पडल्याने शेतक-यांतून संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीसाठी हमीभाव केंद्रावर गर्दी केली होती. मात्र सर्व्हर बंद असल्याने शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी करता आली नाही. परिणामी नोंदणीसाठी आलेल्या शेतक-यांनी हमीभाव केंद्रावरच ठिय्या देत आपला संताप व्यक्त केला. एकूणच तूर खरेदीतील गोंधळाने शेतकरी वेतागला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonlineऑनलाइन