शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जालना दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रीच्या कामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:30 IST

येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे (रजिस्ट्री) मुख्य सर्व्हर संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रजिस्ट्रीच्या कामांचा खोळंबा होत आहे. रजिस्ट्रीसाठी येथे येणा-या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत असून, दिवसभरात केवळ ४० जणांची नोंदणी झाली.

ठळक मुद्देसर्व्हर डाऊन : दिवसभरात केवळ ४० नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे (रजिस्ट्री) मुख्य सर्व्हर संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रजिस्ट्रीच्या कामांचा खोळंबा होत आहे. रजिस्ट्रीसाठी येथे येणा-या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत असून, दिवसभरात केवळ ४० जणांची नोंदणी झाली.दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. शेती, प्लॉट्स, घर खरेदी-विक्रीच्या कायदेशीर दस्त नोंदणीसाठी या कार्यालयात येणा-यांची संख्या अधिक आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामकाज आता आॅनलाईन झाले आहे. मात्र, आॅनलाईन कामाजासाठी वापरण्यात येणारे मुख्य सर्व्हर कायम डॉऊन राहत असल्याने एका दस्त नोंदणीसाठी ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागत आहे. सर्व्हरमुळे कामांचा वेगही मंदावला असून, पुर्वी दिवसभरात होणा-या शंभर रजिस्ट्रींची संख्या आता ४० पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दस्त नोंदणीतून मिळणा-या महसूलावरही परिणाम होत आहे. दस्त नोंदणी झाल्यानंतर व्यवहाराच्या आॅनलाईन नोंदी झालेली कागदपत्रे लगेच देणे आवश्यक असताना, यासाठी संबंधितांना दुसºया दिवशी बोलावले जात आहे. परिणामी ग्रामीण भागातून येणा-या नागरिकांना एकाच कामासाठी दोन दोन चकरा माराव्या लागत आहेत. या कामांचा बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना काम न झाल्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे. नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी या कार्यालयात येणा-या एखाद्या जोडप्याला गैरसोयींचा सामना करावा लागतो. कार्यालयातील सर्व्हरची गती वाढविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामकाज आॅनलाईन झाले. ही चांगली बाब असली, तरी सर्व्हर डाऊन राहत असल्याने एका नोंदणीसाठी तासनतास थांबावे लागते आहे. येथील सर्व्हरची गती वाढविण्यासाठी संबंधित विभागाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या.- ओमप्रकाश चितळकर,बांधकाम व्यावसायिक