शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खराब रस्त्यांमुळे लालपरी खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:59 IST

प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.

ठळक मुद्देभूर्दंड : महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.जालना शहरासह जिल्ह्यातील तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. काही रस्त्यांची अनेक वर्षापासून दुरुस्ती नसल्याने तर काही रस्त्यांचे काम थातूरमातूर झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. अपुरा निधी, निकृष्ट दर्जाची कामे त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम राहिली आहे. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.प्रवाशांसह, नागरिकांची ओरड होऊनही या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षच दिसून येत आहे. या रस्त्यांवरुन एसटी दैनंदिन प्रवास करत असल्याने लालपरीला मोठे नुकसान सोसावे लागते. बसस्थानकापासून खड्डे पडल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे बस खराब होत आहेत. त्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करतात. जिल्ह्यातील अंबड, परतूर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवासाचे हाल होत आहेत.विद्यार्थ्यांची गैरसोयग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बसनेच जातात. परंतु, खराब रस्ता असल्यामुळे परिवहन महामंडळ बस बंद करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांबरोबरच प्रवाशांचीही गैरसोय होते. दररोज ग्रामीण भागातून नागरिक शहराकडे येतात. परंतु, बस नसल्यामुळे नागरिकांचे हाल होतात. नाईलाजाने त्यांना खाजगी वाहनांना जास्तीचे पैसे मोजावे लागते.बसस्थानकही होतय हायटेकजालना शहरातील बसस्थानक हायटेक करण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटींचा निधी दिला आहे. यामुळे येणाºया काळात जालना बसस्थाकाचे रुपडे पलटणार आहे. मात्र, बसस्थानकात येणाºया बसेसे या खिळखिळ््या असणार आहेत.टायर होतात खराबखराब रस्त्यावरुन प्रवासादरम्यान बस आदळून खिळखिळी होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे टायर खराब होतात. त्यामुळे वारंवार टायर बदलावे लागते. तसेच कुठेही टायर खराब झाल्याने चालकांसह प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.आजार उध्दभवतातखराब रस्ता असल्यामुळे बस चालवत असलेले चालक व प्रवाशांना शाध्यांच्या आजारांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा गरोदर महिलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. तर वृध्दांना बसने प्रवास करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

टॅग्स :Jalanaजालनाstate transportराज्य परीवहन महामंडळ