जालना : अयोध्या येथील उभारण्यात येणा-या भव्य श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी भाग्यनगर येथील गणपती मंदिरापासून शुक्रवारी रथयात्रेचे दुपारी दोन वाजता आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा गणपती मंदिर येथून वृंदावन नर्सरी, संजोग नगर, गोकुळ नगरी, राणा नगर, इंदिरा नगर, वृंदावन कॉलनी, कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री नगर (मोहल्ला), आनंदी स्वामी गल्ली, शनि मंदिरमार्गे आनंदवाडी येथील श्रीराम मंदिर येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. रथयात्रेचे उद्घाटन रामदास महाराज (श्रीराम संस्थान, जालना) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या रथयात्रेत महिलानी पारंपरिक वेशभूषेत (नऊवार, गुजराथी, पंजाबी) सहभागी व्हावे. तसेच स्रिया, पुरुष, युवक, युवती, मुले ह्या रथयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप न.प.चे गटनेते अशोक पांगारकर, जिल्हासंघटक सिध्दीविनायक मुळे, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे यांच्यासह आदीनी केले आहे.