शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परतुरात दुर्मिळ चतुर्मुखी गणेश मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:28 IST

आष्टी येथे महाराष्ट्रात दुर्मिळ असलेले चतुर्मुखी गणेशाची मूर्ती असलेले मंदिर आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यातील आष्टी येथे महाराष्ट्रात दुर्मिळ असलेले चतुर्मुखी गणेशाची मूर्ती असलेले मंदिर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून इथे गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. ही परंपरा कायम असून यंदाही गणेश जयंतीनिमित्त येथे धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.मनोकामना पूर्ण करणारा चतुर्मूखी गणपती म्हणून येथील गणपतीची ख्याती आहे. या गणेश मूर्तीचे महत्त्व म्हणजे चारही बाजूने एकाच दगडावर गणेशाची तोंडे असलेली भव्यदिव्य अशी मूर्ती याठिकाणी आहे.आष्टी गावाचे पुरातन नाव अशापूर असे होते. या अशापुर नगरीत शेकडो वर्षापूर्वी येथील पेठ गल्लीत पेठातील देवी म्हणून ओळख असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरासमोर या चतुर्मूखी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. याच मूर्तीसमोर पेठेश्वर नावाने प्रसिद्ध असलेल्या महादेवाची पिंड आहे. गावातील जानकरा मंडळी सांगतात की चारही दिशेला तोंडे असलेला महाराष्ट्रातील गणपतीची ही एकमेव मूर्ती आहे. हा गणपतीची नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती आहे. गणेश जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. यात प्रामुख्याने गणेश यागाचे आयोजन करण्यात येत आहे. तीन दिवस चालणा-या या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारपासून झाली असून, रविवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. गणेश यागदरम्यान दररोज गणेश मुर्तीस एक हजार अभिषेक करण्यात येत आहे. या वर्षीच्या गणेश यागचा मान गावातील सतीश नरहरी शहाणे यांना प्राप्त झाला आहे. या पूजेसाठी गावातील भक्त मंडळी देणगी देऊन पूजेचा मान मिळवितात. यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आलेली असून चिठ्ठी काढून नाव निघेल त्याला पूजेचा मान मिळतो. गावातील सर्व समाजातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात.