शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 10:56 IST

जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंनी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली.

जालना: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता परत एकदा त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. "मला एका ब्राह्णाला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे," असे वक्तव्य दानवेंनी केले. 3 मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकरदेखील (Arjun Khotkar) उपस्थित होते.

जालन्यात ब्राह्मण समाजाकडून 3 मे रोजी भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी केली. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, "ब्राह्मण समाजातील व्यक्तीला फक्त नगरसेवक, नगराध्यक्ष पदांवर पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पाहू इच्छितो,'' असे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले. 

अर्जून खोतकरांचा टोलादरम्यान, रावसाहेब दानवेंनी भाषणा ब्राह्मण समाजातील व्यक्तीले नेतृत्व देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी टोला लगावला. "आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील ब्राह्मण समाजातील आहेत. यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेदेखील ब्राह्मण समाजातील आहेत. त्यामुळे, दानवेंनी ब्रह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करू म्हणण्याची भानगड सोडून द्यावी. आताचे मुख्यमंत्री तेच आहेत. देवेंद्र फडणवीस होतील तेव्हा होती. देवेंद्र फडणवीस माझे सर्वात जवळचे मित्र आहेत. त्यामुळे विद्वत्तेच्या जोरावर कोणीही पुढे जाऊ शकतं," असं खोतकर म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस