शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

...अन् केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हाती घेतली कुऱ्हाड

By विजय मुंडे  | Updated: May 21, 2023 20:02 IST

श्रमदान : घाणेवाडी जलाशयाच्या भिंतीवरील झाडेझुडपे तोडली.

विजय मुंडेजालना : नवीन रेल्वे, नवीन रेल्वे मार्गांसह विविध विकास कामांचे उद्घाटन करणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हाती कुऱ्हाड घेवून घाणेवाडी (ता.जालना) येथील संत गाडगेबाबा जलाशयाच्या भिंतीवरील काटेरी झुडपे तोडली. या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या श्रमदान मोहिमेत रविवारी दानवे यांनी सहभाग नोंदवून श्रमदान करीत सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या भिंतीवरील वाढलेले गवत, काटेरी झुडपे तोडणे, प्लास्टिक कचरा संकलित करण्याचे काम प्रत्येक रविवारी लोकसहभागातून केले जात आहे. यासाठी शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दर रविवारी घाणेवाडी तलावाच्या भिंतीवर सामूहिक श्रमदान करत आहेत.

या श्रमदान मोहिमेत रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सहभाग नोंदवून श्रमदान केले. यावेळी कुंडलिका सीना रिज्यूवनेशन फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन देसाई, रमेशभाई पटेल, सुनील रायठठ्ठा, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत, अर्जुन गेही, शिवरतन मुंदडा, उदय शिंदे यांच्यासह महिला व बच्चे कंपनीची उपस्थिती होती.

लोकसहभाग महत्त्वाचाच: दानवेकाम कोणतेही असो त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून सार्वजनिक स्वच्छता नदीपात्रातील कचरा प्लास्टिक काढण्यासह वृक्षारोपण, श्रमदान अभियान हा जालन्यातून नवीन पॅटर्न तयार झाला आहे. लोकसहभागातून शासन यंत्रणा जागृत होते. असे सांगताना घाणेवाडी जलाशयाच्या सांडव्याची तात्काळ दुरूस्ती करणे, तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या सूचनाही दानवे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालना