शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात रेमडेसीवीरची काळ्या बाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 22:01 IST

भुसावळ : रेमडेसिविर इंजेक्शनची तब्बल २० ते २५ हजारात विक्री करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २१ रोजी ...

भुसावळ : रेमडेसिविर इंजेक्शनची तब्बल २० ते २५ हजारात विक्री करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २१ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी लॅब चालक विशाल शरद झोपे (२८) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (१८) रा.मानमोडी, ता.बोदवड यांना अटक करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.आरोपींनी आतापर्यंत या माध्यमातून ३० ते ३५ नागरिकांना या इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीअंती आणखीन काही नाव समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.अशी केली कारवाईबद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये चढ्या दराने रेमडेसिविर इंजेक्शन मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करण्यात आली व अचानक धाड टाकून आरोपींनी रुमालात गुंडाळलेले व एक फुटलेले इंजेक्शन आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जप्त इंजेक्शनमध्ये १०० एमजीचे हॅड्रा कंपनीचे तीन प्रत्येकी किंमत ५ हजार ४०० व रेमडीक कॅडीला कंपनीचे एक इंजेक्शन किंमत ३ हजार ४०० असे एकूण १९ हजार ६०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले. पोलिसांना हॅड्रा कंपनीचे एक फुटलेले इंजेक्शन आढळले. मात्र त्याची किंमत लावण्यात आली नाही.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, ईश्‍वर भालेराव, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान दोन पंचांना सोबत घेण्यात आले तर एफडी निरीक्षक अनिल माणिकराव यांनी इंजेक्शनची तपासणी करून ते अधिकृत असल्याचे सांगितले.बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस चौकशीत लॅब मालकाने आतापर्यंत १५ ते २५ हजार रुपये दराने भुसावळात आतापर्यंत ३० ते ३५ हजारात रेमडेसिविरची विक्री केल्याची माहिती दिली आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. दरम्यान लॅब संचालिका डॉ. सुकन्या झोपे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.बाथरूममध्ये सापडले इंजेक्शनलॅब सीलची कारवाई नगर पालिका मुख्याधिकारी संदिप चिद्रवार यांनी केली. यापूर्वी लॅबमध्ये तपासणी केली असता तेथील बाथरूममध्ये एका शर्टच्या खाली इंजेक्शन लपविले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या ठिकाणी चार इंजेक्शन होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ