लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : रस्त्याच्या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. कुंभार पिंपळगाव ते पिंपरखेड या सात किलोमीटरच्या रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली.या रस्त्याची मागली पंधरा वर्षांपासून दुरुस्तीच करण्यात आली नाही. यामुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला. पिंपरखेडा गावची प्रति पंढरपूर म्हणून ओळख आहे. इथे विठ्ठल रुख्मिनी मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र पिंपरखेड ते कुंभार पिंपळगाव या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यानंतर या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मागणी मान्य झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:38 IST