शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राजेश नहार खून प्रकरण; दोन मारेकऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 01:10 IST

परतूर येथील व्यापारी राजेश माणिकचंद नहार यांचा ११ जानेवारीला जालना ते मंठा मार्गावरील शिंगाडी पोखरी येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता. दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतूर येथील व्यापारी राजेश माणिकचंद नहार यांचा ११ जानेवारीला जालना ते मंठा मार्गावरील शिंगाडी पोखरी येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणा-या राजेश नहार हत्याकांडातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली होती. नहार यांना जालन्यातील व्यापारी विजयराज सिंघवी यांच्यावर गोळीबार करण्यासह बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या घरावर प्राणघातक हल्ला करण्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. नहार यांनी मुनोत यांना जिवे मारण्यासाठी ५० लाख रूपयांची सुपारी दिली होती. त्या पैकी पाच लाख रूपये संबंधित शूटरला दिलेही होते. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या दोन शूटरलाही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.अट्टल गुन्हेगार : १० ते १२ गंभीर गुन्हेराजेश नहार खून प्रकरणातील अटक आरोपींपैकी रघुवीरसिंग टाक याच्या विरूध्द यापूर्वीच १० ते १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याला साथ देणारा अरविंद भदरगे याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे दिसून आले.या दोघा संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना त्यांचे सर्वस्व पणाला लावावे लागल्याचे दिसून आले. मिळालेली गुप्त माहिती नव्याने तपासण्यासह त्याची पडताळणी करणे आणि आरोपींचा माग काढणे हे देखील मोठे आव्हान होते.

टॅग्स :MurderखूनArrestअटक