शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

परतूर तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:08 IST

दोन दिवसाच्या खंडानंतर पुन्हा पावसास सुरूवात झाली असून रविवारी मध्यरात्रीपासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यात दोन दिवसाच्या खंडानंतर पुन्हा पावसास सुरूवात झाली असून रविवारी मध्यरात्रीपासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे.तालुक्यात मागील २० ते २५ दिवसापासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या गुरुवारपासून पासून पडत असलेल्या पावसाच्या अगमनाने शेतकरी सुखावला आहे. ब-याच दिवसा पासून पाऊस गायब झाल्याने जोरदार आलेली पिके हातातून जातात की, काय अशी भीती शेतक-यांत निर्माण झाली होती. विहिरी, बोअर तलावांनी तळ गाठला होता. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला. मात्र १५ आॅगस्टच्या रात्री पासून दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. नद्या, नाल्यांना पाणी आले, पाणी पातळीतही वाढ होत आहे. आता दोन दिवसाच्या खंडानंतर रविवारीच्या मध्यरात्री नंतर पुन्हा संतत धार पावसाने हजेरी लावली. सोमवारी तालूक्यात १४ .४० मि.मी. पावसाची नोंद झाली. पुन्हा सकाळपासून संतत धार रिमझिम पाऊस सुरूच आहे. या पावसाने आता शेतात पाणी भरत आहे.शहरातील रस्त्याची दुर्दशाशहरतील मुख्य रोडसह गल्ली बोळातील रस्ते काम सुरू असल्याने फोडण्यात आले आहेत. माती वर आल्याने चिखल होऊन वाहने फसत आहेत. मुख्य रोडवरील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक एका अरूंद रस्त्याने वळवण्यात आली आहे. हा रस्ताही फोडण्यात आल्याने चिखल व पाणी या रोडवर साचत असल्याने व हा रस्ता अरूंद असल्याने वाहतुकीची सतत कोंडी होऊन वाहनधारक त्रस्त होत आहे.परतूर वाटूर रोडचे रूंदीकरण सुरू असल्याने रोड फोडण्यात आला आहे. यामुळे चिखल व खड्डे होऊन वाहने काही ठिकाणी घसरत आहेत, तर काही ठिकाणी फसत आहेत. या रोडवरून प्रवास धोकादायक बनला आहे. या कामावरील ठेके दारांनी अशा ठिकाणी मुरूम टाकणे आवश्यक आहे. मात्र या कामावरील ठोकेदार दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तशीच अवस्था शहरातही आहे. कुठेच वाहनधारकांची किंवा नागरिकांची काळजी नगरपालिका प्रशासन घेताना दिसत नाही. शहरात कुठेच मुरूम टाकला जात नाही. यामुळे या दोन्ही वाटूर-परतूर- आष्टी व शहरातील कामातून लोकांना मोठा मनस्ताप सध्यातरी सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018