रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे पावसामुळे अनेकांनी दणादाण उडाली. होती. वाऱ्यामुळे घरावरील पत्रे, आणि झाडे उन्मळून पडल्याने अनेकांची गैरसोय झाली.गेलकरडगाव, रांजणीवाडी येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने घरातील साहित्य भिजले होते. विद्युतपोल पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. तो अद्यापही सुरळीत न झाल्याने गर्मीमुळे ग्रामस्थाचे हाल होत आहे. काही ठिकाणी झाडे पडली तर काही भागात विद्युत पोल पडले यात करडगाव, रांजणीवाडी व रांजणी येथे मोठे नुकसान झाले आहे. गावातील सखल भागात पाणी साचले होते. करडगाव येथे चत्रभुज घुले व रामचंद्र घुले यांच्या घरावतील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाल्याचे सरपंच सरपंच अरुण मोरे यांनी सांगितले.
रांजणी परिसरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:10 IST
घनसावंगी तालुक्यातील रांजणी परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे पावसामुळे अनेकांनी दणादाण उडाली होती.
रांजणी परिसरात पाऊस
ठळक मुद्देपत्रे उडाली : करडगाव,रांजणीवाडीत विद्युतपोल, झाडे पडली