शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत; मनोज जरांगेंनी शासनाला दिली रात्रीपर्यंतची वेळ

By विजय मुंडे  | Updated: November 1, 2023 12:15 IST

दाेषींना सोडून शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना विनाकारण उचलू नका.

अंतरवाली सराटी (जि.जालना) : इंटरनेट बंद केल्याने हजारो युवकांनी रात्रभर इथं खडा पहारा दिला. इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. शासनाने आज रात्रीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी बुधवारी सकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले शांततेचे आंदोलन आता मोठे झाले आहे. त्यामुळे ते आंदोलन दडपण्याचा शासनाचा डाव असू शकतो. मी इथून उठणार नाही आणि ते मला उठवू शकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दुसऱ्या वेळेस बैठक बोलाविली आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविणार की नाही, देणार तर किती दिवसात देणार ही भूमिका स्पष्ट करावी. शासनाने आज भूमिका स्पष्ट केली नाही तर रात्रीपासून पुन्हा पाणी पिणे बंद करणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

विनाकारण मुलांना उचलू नकाबीड, केजमध्ये शांततेत साखळी उपोषण, आमरण उपोषण सुरू आहे. दाेषींना सोडून शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना विनाकारण उचलू नका. ज्यांना उचलले त्यांना सोडल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, तसे झाले नाही तर आपण बीडचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक मुलांवर कसा अन्याय करतात ते पाहू असेही ते म्हणाले.

नितेश राणे यांनी बोलू नयेएकीकडे नितेश राणे मला फोन करून गोडगोड बोलतात तर तिकडे दुसरे बोलतात. आता त्यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही आणि नितेश राणे यांनीही इथून पुढे बोलू नये. माझा बोलाविता धनी कोण हे प्रसाद लाड यांना भेटल्यावर सांगतो, असेही जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण