लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राजीव सातव यांच्यावर गुजरात पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा सोमवारी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला. काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांनी गांधीचमन चौकात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रा. सत्संग मुंडे यांनी या निषेध सभेचे आयोजन केले होते. जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आर. आर. खडके, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, सचिव विजय कामड, नगर परिषदेचे गट नेते गणेश राऊत, आलम खान, राजेश राठोड, राजेश काळे, सुरेश गवळी, शेख महेमूद, दिनकर घेवंदे, बदर चाऊस, धर्मा खिल्लारे, नवाब डांगे, डॉ. सुभाष ढाकणे, जालना युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. संजय खडके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रा. मुंडे म्हणाले, काँग्रसने भाजपसारखे खालच्या थराचे राजकारण केले नाही. यावेळी शेख शमशोद्दीन, बासेद कुरेशी, कादर मोमीन, बाबूराव सतकर, जगदीश येनगुपटला, रविंद्र गाडेकर, शहराध्यक्ष शेख जुनेद, युवक अध्यक्ष जुनेद खान यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सातव यांच्या अटकेचा काँग्रेसकडून जालन्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:07 IST
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राजीव सातव यांच्यावर गुजरात पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा सोमवारी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला. काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांनी गांधीचमन चौकात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली.
सातव यांच्या अटकेचा काँग्रेसकडून जालन्यात निषेध
ठळक मुद्देभाजप अध्यक्षांच्या प्रतिमेला जोडे मारुन घोषणाबाजी