अंबड येथील शिबिरात ४४ दात्यांचे रक्तदान
अंबड : शहरातील जय स्वयंभू ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४४ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवराज लांडे, अमोल ठाकूर, गणेश लोहकरे, बाळासाहेब इंगळे, अमोल वराडे, शिवाजी लांडे, अविनाश राठोड, अरूण शर्मा, स्वप्नील सपकाळ, गणेश खवाटे, अमोल राऊत, संजय राऊत, अक्षय भोजने, किशोर मुळे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
निधी संकलनासाठी देहेड येथे शोभायात्रा
भोकरदन : आयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील देहेड येथे शोभायात्रा काढण्यात आली. गावातील विविध मार्गावर ग्रामस्थांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. दिवसभरात जवळपास २४ हजार ९०० रूपयांचा निधी संकलित करण्यात आला. यावेळी टाळ-मृदंगाचा गजर आणि श्रीरामांच्या जयघोषाने गाव दुमदुमून गेले होते.
काजळा येथील सप्ताहाची सांगता
बदनापूर : तालुक्यातील काजळा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची हभप ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी ज्ञानेश्वर महाराज जाधव यांनी विविध दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी काजळासह परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.
शरदचंद्रजी पवार विद्यालयात कार्यक्रम
घनसावंगी : तालुक्यातील मूर्ती येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके, शहादेव नाडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.