माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे श्रीराम मंदिर बांधकामासाठी बुधवारी शोभायात्रा काढून निधी संकलित करण्यात आला. येथील मारोती मंदिरापासून शोभायात्रेला सुरूवात झाली. यात तब्बल ४५ लाख रूपयांचा निधी जमा करण्यात आला.
यावेळी सरपंच वैशाली कासोद, उपसरपंच गजानन साळोक, पं.स. सभापती विमल गोरे, कृऊबाचे सभापती भाऊसाहेब जाधव, डॉ. रवींद्र कासोद, दगडुबा गोरे, गजानन लहाने, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गव्हले, वामन लहाने, संतोष वरपे, संतोष गौरकर, गंगाधर अहिरे, सांडू वाघ, सतीश शहागडकर, राजू सिरसाठ, मारोती कासोद, भास्कर जाधव, पंकज जाधव, कैलास लहाने, बाळू जाधव, योगेश औटी, अरूण सिरसाठ, अशोक पोफळे, नारायण बाबने, विक्रम ठाकूर, संदिप पोटे, त्र्यंबक साबळे, नारायण कळंब, सुभाष शहागडकर आदींची उपस्थिती होती.