मसापतर्फे आज एकांकिका व कविसंमेलन
जालना : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई आणि मराठवाडा साहित्य परिषद जालना शाखेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी ६. वाजता जुना जालना भागातील राष्ट्रवादी भवन सभागृहात एकांकिका व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मसापचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर व सचिव पंडित तडेगावकर यांनी दिली. राजेंद्र राख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आर.आर. खडके हे राहतील. तरी या सोहळ्यास साहित्य व सांस्कृतिक रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मसापचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, सचिव पंडित तडेगावकर यांनी केले आहे.
_______________
पीककर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण
तीर्थपुरी : तीर्थपुरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेकडून पीककर्ज मिळत नसल्याने मंगरुळ खरात येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. येथील ३९ शेतकऱ्यांनी जून २०१९ मध्ये कागदपत्रांची पूर्तता करून बँकेकडे पीककर्जाचे प्रस्ताव सादर केले होते, परंतु, बँकेकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तातडीने पीककर्ज द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी रामप्रसाद खरात, गिरजाबाई शरणागत, एकनाथ राखुंडे, बाळासाहेब खरात, भागवत खरात, दिगंबर बागल, गोदावरी जावळे, सुग्रीव राखुंडे, बाबुराव बेवले, अनिल खरात, दगडू जाधव, सुखदेव राखुंडे, महादेव राखुंडे, गणपत शरणागत आदींची उपस्थिती होती.
-------------------