धावडा- भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव येथील सरपंच सखूबाई आंबेकर या तीन वर्षांपूर्वी जनतेतून निवडून आलेल्या होत्या. १२ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विरोधात तहसीलदार संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठराव आणला होता. हा ठराव पारितही झाला. दरम्यान, एका महिन्याने ११ डिसेंबर रोजी पुन्हा सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान घेण्यात आले. त्यातही सरपंच सखूबाई आंबेकर यांच्याविरुद्ध जनतेने मतदान केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. परिणामी येथील सरपंचपद रिक्त होते. यासाठी २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याचे तहसीलदारांचे नियोजित होते. मात्र, कोरोनाचा या ठिकाणी मोठा कहर झाल्याने ही निवड रद्द करण्यात आली आहे. ही प्रक्रिया तूर्तास थांबवण्यात आली असली तरी मागील वेळी थेट जनतेतून सरपंचपद निवडण्यात आले होते. आताही हिच प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे.
जाळीचा देव येथील सरपंचपद निवडीची प्रक्रिया तूर्तास स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST