शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:39 IST

जालना लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरूवार पासून प्रारंभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरूवार पासून प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी तीन यावेळेत हे अर्ज दाखल करता येणार आहेत. याच्या तयारीचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी पाहणी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात हे उमेदवारी अर्ज भरता येणार असून, उमेदवारी अर्ज भरताना केवळ पाच जणांनाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना ते इनकॅमेरा होणार आहेत. अर्जासोबत कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे, याचा तपशील यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिला आहे.निवडणुकीच्या कामांची तयारी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात जोरात सुरू असून, बैठकांवर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षेचे आवश्यक ते उपाय करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी यावेळी दिली. गुरूवारी पाच निवडणूक निरीक्षक जालन्यात दाखल होणार असून, त्यांच्या निवासाची तसेच त्यांना मतदार संघात फिरण्यासाठी वाहने तैनात करण्यात आली आहेत. बुधवारी दुपारी जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अर्ज भरण्याच्या तयारीचा आढावा घेतला.यावेळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके आदींची उपस्थिती होती.दुसºया दिवशीही यंत्रांची रवानगीजालना लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानभा मतदारसंघात मतदान यंत्र पोहोचवण्याचे काम मंगळवार प्रमाणेच बुधवारीही सुरू होते. यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, पैठण, फुलंब्री आणि सिल्लोडला मतदान यंत्रे रवाना करण्यात आल्याची माहिती असून, जालना, बदनापूर तसेच भोकरदन मतदारसंघातही तहसीलदारांकडे हे यंत्र पोहोचते करण्यात येत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना