शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

४०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; हद्दपारीचे १४ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:01 IST

जालना शहरातील संवेदनशील भागाचा सदरबाजार पोलीस ठाण्यांतर्गत समावेश आहे. घडणाऱ्या घटना पाहता या ठाण्याची फोड करून नवीन ठाणे निर्माण व्हावे, यासाठी दहा ते बारा वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव प्रलंबित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील सदरबाजार पोलीस ठाण्यांतर्गत चालू वर्षातील नऊ महिन्यात तब्बल ३६८ गुन्हे दाखल झाले आहेत. गतवर्षी याच कालावधीत २६८ गुन्हे दाखल होते. यंदा दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये घरफोडीच्या ३० तर चोरीच्या ११७ घटनांचा समावेश आहे.जालना शहरातील संवेदनशील भागाचा सदरबाजार पोलीस ठाण्यांतर्गत समावेश आहे. घडणाऱ्या घटना पाहता या ठाण्याची फोड करून नवीन ठाणे निर्माण व्हावे, यासाठी दहा ते बारा वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव प्रलंबित आहे. या ठाण्यात १५१ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. सध्या एक पोलीस निरीक्षक, एक सपोनि, चार फौजदारांसह १०२ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १२ कर्मचारी विविध ठिकाणी संलग्न आहेत. तर साप्ताहिक, रजेवर जाणारे कर्मचारी वगळता दैनंदिन ६० ते ७० कर्मचारी राहत आहेत. याच कर्मचा-यांच्या खांद्यावर रात्रगस्त, गुन्ह्यांचा तपास, वॉरंट, समन्स अंमलबजावणी, विविध प्रकारचे बंदोबस्त आदी कामे पडली आहेत. अपु-या कर्मचा-यांमुळे चोरट्यांचेही फावत आहे. चालू वर्षात जबरी चोरीच्या १७, घरफोडीच्या ३०, चो-याच्या ११३, दंग्याच्या १९ यासह इतर घटना घडल्या आहेत. या घटनांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी १०७ अंतर्गत तब्बल ४०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर १०९ अंतर्गत ८ जणांवर, ११० अंतर्गत ६६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारीच्या १४ प्रस्तावांपैकी दोघांवर कारवाई झाली आहे. इतर प्रकरणे प्रलंबित आहेत.सदर बाजार पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या भागापैकी अनेक भाग हे संवेदनशील आहेत. शिवाय याच भागात शहरातील मोठी बाजारपेठ असून, इतर मोठे कार्यक्रमही होतात. चो-या, घरफोड्या, हाणामा-यांच्या घटना पाहता कायदा-सुव्यवस्थेचा अबाधित ठेवण्यासाठी काद्राबाद पोलीस ठाण्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. याकडे पदाधिका-यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.ठाण्याला मंजूर पदसंख्या मोठी असली तरी संलग्न कर्मचारी, रजा, साप्ताहिक, विविध प्रकारचा बंदोबस्त यासह इतर कामे पाहता अर्ध्यावरच कर्मचारी कार्यरत राहतात. त्यामुळे ऐन वेळी एखादी घटना घडली तर अधिकारी, कर्मचा-यांना धावपळ करावी लागते. शिवाय कर्मचा-यांची संख्या कमी असल्याने दाखल गुन्ह्यांच्या तपासावरही परिणाम होताना दिसत आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना