शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनासाठी दबाव तंत्राची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:44 IST

जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे.

बाबासाहेब महस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. थेट खरेदीने जमीन न दिल्यास भूसंपादन कायद्यानुसार जमीन घेण्यात येईल, असे शेतक-यांना सांगितले जात आहे.राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नियम व अटींमध्ये वारंवार बदल केला जात आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आजही संयुक्त मोजणीतील त्रुटी दूर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासह महामंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शिबीर कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा बाधित शेतक-यांचा आरोप आहे. जालना तालुक्यातील १५ गावांमधील ३६४ खरेदीखतांच्या माध्यमातून आतापर्यंत १७२.५९ तर बदनापूर तालुक्यातील १० गावांमधील २६८ खरेदीखतांच्या माध्यमातून ११८ हेक्टर जमिनीची खरेदी पूर्ण झाली आहे. दोन्ही तालुक्यात शासकीय व खाजगी मिळवून आतापर्यंत ३६६.६२ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत १४४ हेक्टर जमिनीचे संपादन अद्याप बाकी आहे. यातील काही शेतकºयांच्या जमिनीचा न्यायालयीन वाद सुरू आहेत. तर मोजणीतील त्रुटी आणि वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी काही शेतक-यांनी जमिनीचे खरेदीखत अद्याप पूर्ण केलेले नाही. जिल्ह्यात आता केवळ २७ टक्के भूसंपादन बाकी असल्याने राज्यशासनाने ही जमीन भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसा अध्यादेशही शासनाने काढल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, तो अद्याप जिल्हास्तरावर पोहचलेला नाही. भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने जमीन संपादन केल्यास शेतक-यांवरील दबाव वाढणार आहे. अप्रत्यक्षरीत्या दोन्ही तालुक्यातील शेतक-यांना तशी माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाने जाहीर केलेल्या मोबदल्यातच शेतकºयांनी आपल्या जमिनी लवकर महामार्गास द्याव्यात, त्यासाठी हे दबाव तंत्र वापरले जात असल्याचे खादगाव येथील एका शेतक-यांने सांगितले. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे सुरू करण्याची घाई झाल्याने राज्यशासन शक्य जमीन संपादनासाठी शक्य त्या मार्गांचा वापर करताना दिसत आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी