शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनी आता केवळ ठेकेदारांचे घर भरण्यासाठीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:44 IST

मसूदा मांडल्यावर देशातील दहा लाख वीज कर्मचारी लगेचच संपावर जाणार असल्याची माहिती वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि देशातील भाजप सरकार हे उद्योग धार्जीणे असून, वीज वितरण कंपन्यांचे खाजगी करण हे तत्कालीन आघाडी सरकारने केल्यावर आता या सरकारने त्यावर कढी करत, सर्व कामे ही कंत्राटदारांचे खिसे भरणारीच काढली आहेत.कंत्राटदार थातूरमातूर कामे करून बिल काढून घेतो, आणि नंतर त्यांनी अर्धवट केलेले काम पुन्हा आमच्या मूळ कर्मचाऱ्यांनाच पूर्ण करावे लागत आहेत. ही बाब गंभीर आहे. त्यातच आता २००३ च्या वीज कायद्यात बदलकरून केंद्र सरकार लोकसभेच्या आगामी हिवाळी अधिवशेनात नवीन मसूदा मांडणार आहे.मसूदा मांडल्यावर देशातील दहा लाख वीज कर्मचारी लगेचच संपावर जाणार असल्याची माहिती वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी एका हॉटेलमध्ये वर्कर्स फेडरशेनची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष सी.एन. देशमुख, कृष्णा भोयर, पी. एम. कुलकर्णी तसेच अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर कामगारांची उपस्थिती होती. या बैठकी नंतर शर्मा यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, आज देशातील उर्जा क्षेत्राची मागणी पूर्ण करताना मोठी आव्हाने आहेत. त्यातच सरकारकडे निश्चित असे कुठलेच धोरण नाही.केवळ उद्योजकांच्या तुंबड्या भरण्यासाठी बीएसएनएल प्रमाणे वीज वितरणची अवस्था केली आहे. भविष्यात त्यात आणखी चुकीचे निर्णय घेतले जाणार आहेत. वीज कायदा २००३ मध्ये देखील अनेक कल्याणकारी तरतुदींना फाटा देण्यात येणार असून, हे बिल नव्याने सादर करण्याचा सरकारचा विचार आहे. त्या विरोधात आमची संघटना देशभर रान उठवणार आहे.दरम्यान वर्कर्स फेडरेशनच्या स्थापनेस यंदा शंभरवर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त मुंबईत देशव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, देशातून दहा लाख कामगार त्यावेळी येणार असल्याचे शर्मा म्हणाले यावेळी सी.एन. देशमुख, भोयर, कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजCentral Governmentकेंद्र सरकार