जालना : जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार असून, ८,७५८ उमेदवार रिंगणात आहेत. तर ३,३१४ महिला उमेदवार ही निवडणूक लढविणार आहेत.
जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. यासाठी नुकताच आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता केवळ ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६५३ जागांसाठी मतदान होणार आहे. १ हजार ४७९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी ७ हजार ४५६ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पोलीस बंदोबस्त
जालना जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी १२६ अधिकारी, १,१५० पोलीस कर्मचारी, एक हजार होमगार्ड व दोन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी
जिल्ह्यातील ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज ४४६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. जवळपास ८ हजार उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. १,४७९ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडेल. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- निवडणूक निर्णय अधिकारी कोट,