शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरातील पोलीस चौक्या कुलूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:29 IST

लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विविध भागांमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहे. परंतु लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील नागरिकांना काही तक्रार द्यायची असेल तर पोलीस ठाणे दूर पडते. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यांतर्गत शहरात सात चौक्या उभारण्यात आल्या. यात बडीसडक, काद्राबाद, मंमादेवी, बाजार पोलीस चौकी, नूतन वसाहत, जवाहर नगर, भोकरदन नाका या ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या. परंतु, चौक्यांमध्ये पोलीस कर्मचारी थांबत नसल्याचे लोकमतने रविवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.बडीसडक येथील पोलीस चौकीची पाहणी केली असता, तेथील चौकीला कुलूप दिसले. नागरिकांना विचारले असता, या चौकीत पोलीस थांबत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तेथूनच जवळ असलेली काद्राबाद पोलीस चौकीही बंद दिसली. चौकीची इमारत सुज्ज आहे. परंतु येथे कोणीच दिसले नाही.मात्र, मंमादेवी चौकातील पोलीस चौकीत कर्मचारी दिसले. नूतन वसाहत परिसरातील पोलीस चौकीची तर दुरवस्था पाहायला मिळाली. चौकीसमोरच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत.चौकीला दरवाज्या नसल्याने चॅनल गेटला कुलूप दिसले. शहरातील सर्वच चौक्यांवर लाखों रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, एकाही चौकीत कर्मचारी नसल्याने चौक्या फक्त शोभेची ठिकाणे बनल्या आहेत.याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.घाणीचे साम्राज्यचौक्यांची पाहणी केली असता, बडी सडक, काद्राबाद या चौक्यांचा परिसर स्वच्छ दिसला. परंतु मंमादेवी चौकी, नूतन वसाहत येथील चौकी समोरच घाणीचे साम्राज्य दिसले. या चौकीच्या भिंतीही पडलेल्या आहे. तसेच खिड्यांची काचे, कचऱ्याचे ढीगही येथे आढळून आले.बाजार चौकातील पोलीस चौकी तर नेहमीच बंद राहत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या परिसरात नेहमीच गर्दी असते. येथे पोलीस कर्मचारी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरजलाखो रुपये खर्च करुन शहरातील विविध भागांमध्ये चौक्या तयार करण्यात आल्या. परंतु, याकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष असते. याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना