शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी खदानीतून शोधून काढली बँकेची तिजोरी; चोरट्यांच्या टोळीला २४ तासांत केले जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:21 IST

बँकेची तिजोरी पळवणारी टोळी २४ तासात जेरबंद

ठळक मुद्देजालना जिल्ह्यातील घटना चोरीच्या पैश्यातून घेतली दुचाकी, एलईडी

जालना : घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७ लाखांसह तिजोरी चोरट्यांनी लांबविली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत लावला असून, मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे. 

पानेवाडी येथे जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जुनी शाखा आहे. त्या शाखेतील तिजोरीत जवळपास साडेसात लाख रुपये होते. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी ही संधी साधत चक्क तिजोरीच पळवली होती. चोरीचे चित्रीकरण होऊ नये यासाठी चोरट्यांनी सुरुवातीला सीसीटीव्हीची तोडफोड करून डिव्हाईस चोरले. ही चोरी झाल्याची तक्रार बँक व्यवस्थापाने पोलिसांकडे दिली. दरम्यान याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे गौर, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, कुरेवाड, देशमुख, मगरे, कायटे, बगाटे, गडदे, सागर बावीस्कर, कृष्णा तंगे, चौधरी, फलटणर, उबाळे, मांटे, जाधव, चेके, जायभाये आणि पैठणे यांचा समावेश आहे. 

तिजोरीत होते सात लाख २८ हजार चोरट्यांनी जी तिजोरी पळवली होती तिच्यात सात लाख २८ हजार रुपये होते. पोलिसांनी आरोपीकडून बँकेची तिजोरी, चोरीसाठी वापरलेली जीप व दुचाकी जप्त केली. तसेच चोरीच्या पैशातून घेतलेला टीव्ही गजानन शिंगाडे याच्याकडून जप्त केला. पोलिसांनी एकूण सहा लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी जालना येथील शिकलकरी मोहल्ला परिसरात शनिवारी अचानक छापा टाकून हरदीपसिंग बबलूसिंग टाक याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे सहकारी गोपीसिंग मलखामसिंग कलाणी, किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक, गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव) यांना ताब्यात घेतले.

खदानीतून काढली तिजोरीचोरट्यांनी बँकेतून चोरलेल्या तिजोरीतील रक्कम काढून घेतली. त्यानंतर ती तिजोरी शहरातील द्वारकानगरच्या मागे असलेल्या खदानीत फेकून दिली होती. पोलिसांनी जेसीबीच्या सहायाने ही तिजोरी खदानीतून बाहेर काढली.

चोरलेल्या चारचाकीचा वापरपानेवाडी येथील शाखेतील तिजोरी आणण्यासाठी चोरट्यांनी चोरलेल्या जीपचा वापर केला. ती जीप जालना शहरातील श्रीकृष्णनगर, संभाजीनगर येथून चोरण्यात आली होती. या प्रकरणात सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. चोरीची ही जीपही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

एकाने घेतली दुचाकी, दुसऱ्याने घेतली एलईडीतिजोरीतून रक्कम काढल्यानंतर ती वाटून घेण्यात आली. वाट्याला आलेल्या रक्कमेतून एकाने दुचाकीची खरेदी केली होती. तर दुसऱ्याने एलईडी टीव्ही खरेदी केला होता. त्या दुचाकीसह एलईडी टीव्हीही पोलिसांनी जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाbankबँकRobberyचोरी