शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लूट प्रकरणातील पाच जणांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:43 IST

मारहाण करुन डोळ्यात मिरचीपूड टाकून सेल्समनचे पावनेदोन लाख रुपये लुटणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना : मारहाण करुन डोळ्यात मिरचीपूड टाकून सेल्समनचे पावनेदोन लाख रुपये लुटणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.गुजरात येथील सेल्समन जतीन मन्सूखभाई ठक्कर हे बुधवारी जालना येथील जिंदल मार्केट येथील एका कटलरी दुकानात वसुलीसाठी आले होते. त्याच कटलरी दुकानातील ओळखीच्या नोकर बाळू अप्पा लंगोटे याला सोबत घेऊन रात्री दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद निघाले होते. जालना औरंगाबाद मार्गावर असलेल्या एकता हॉटेल परिसरात आल्यानंतर बाळू लंगोटे याने लघवी करण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबविताच पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी अचानक हल्ला करुन ठक्कर यांना लाकडी काठीने मारहाण केली. तसेच डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख १ लाख ७० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पसार झाले होते. वर्दळीच्या जालना - औरंगाबाद महामार्गावर लुटीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. जतीन ठक्कर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोनि. राजेंद्रसिंग गौर यांना माहिती कळताच त्यांनी तपासाची चके्र फिरवून बाळू रामआप्पा लंगोटे, (२४), सुशांत राजू भुरे (२०), रवी आनंद कुस्लमवार (२५), लक्ष्मण किसन गोरे (२२) अमोल एकनाथ काचेवाड (२२) यांना ताब्यात घेतले.पकडलेले आरोपी सराईतपकडेलेल्या पाच आरोपीपैकी दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारे लुटीच्या घटनेत या टोळीचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. टोळीकडून जिल्ह्यासह इतर कोठे अशा प्रकारे लुटमार केली आहे याचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी