शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळ्यातील आरोपीस १६ पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:59 IST

वक्फ बोर्डाच्या जमिनीचे निकष डावलून विल्हेवाट लावणाऱ्या सैय्यद जमील सैय्यद जानीमियाँ उर्फ मौलाना जमील यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीचे निकष डावलून विल्हेवाट लावणाऱ्या सैय्यद जमील सैय्यद जानीमियाँ उर्फ मौलाना जमील यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १६ सप्टेबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.येथील सर्व्हे क्रमांक १०१, १०२ आणि १०३ मधील दर्गा शेरसवारच्या जवळपास २८ एकर जमिनीची चुकीच्या पध्दतीने निकष डावलून विल्हेवाट लावल्या प्रकरणी वक्फ बोर्डाने जमील यांच्या विरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हे भूखंड शहराच्या भोकरदन नाका परिसरातील असून, ज्यांची किंमत काही कोटींमध्ये जाते. या जमिनीवर इमारती, शॉपिंग सेंटर तसेच अन्य बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. या प्रकरणी वक्फ बोर्डाचे औरंगाबाद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद सिराज अहमद यांनी २७ मे २०१९ रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात मौलाना जमील याच्या विरूध्द तक्रार दाखल केली होती.मौलाना जमील हे शेरसवार दर्गाचे अधिकृत मुतावली नसताना त्यांनी चुकीचे अधिकार वापरून जमिनीची परस्पर विक्री अनेकांना केली होती, असे तक्रारीत नमूद केले आहे. गुन्हा दाखल झाल्यावर जमील मौलाना यांनी जिल्हा न्यायालयातअटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळ्यावर त्यांनी उच्च न्यायालय तसेच नंतर सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देखील मौलाना जमील यांचा अर्ज फेटाळला होता. हा सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी त्यांना अटक केल्याची माहिती तपासाधिकारी डीवायएसपी खिरडकर यांनी दिली.बुधवारी मौलाना जमील यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांच्याकडून या प्रकरणाचे अनेक कागदपत्रे तसेच व्यवहार तपासायचे असून, त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे मान्य केले. आता या भूखंड घोटाळ्यातून नेमके काय समोर येते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकCourtन्यायालय