शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुक्तीचे स्वप्न धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:02 IST

शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे.प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याने शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. यामुळे शहरात सुध्दा याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र आधीच सुस्त असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांवर वचक बसावा ऐवढीही कारवाई नाही. कडक अंमलबजावणी होऊन प्लास्टिक मुक्त जालना होईल, असे वाटले होते. मात्र २२ दिवस उलटूनही शहरात प्लास्टिकचा वापर कमी होण्यापेंक्षा अधिक वाढत असल्याचे दिसत आहे. शहरातील दुकाने असो वा पानटपरी येथे सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत आहे. यामुळे शहर प्लास्टिकमुक्त होईल का, असा प्रश्न निर्माण होत आहे.प्लास्टिकचा घातक परिणाम लक्षात घेता प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. मात्र, ही सूचना जालना नगरपालिकेने म्हणावी, तशी मनावर घेतलेली दिसत नाही. तसेच शहरातील व्यावसायिकांनी सुध्दा ही गांभिर्याने घेतली नाही. त्यांनी प्लास्टिकचा वापर सुरुच ठेवला आहे. अलिकडच्या काळात प्लास्टिकचा वापर दैनदिन व्यवहारातील अविभाज्य घटक बनला आहे. यामुळे प्लास्टिकचा वापर चांगलाच वाढलेला आहे. प्लास्टिक नष्ट होत नसल्याने याचे लोण शहरासह ग्रामीण भागात पसरले आहे. यामुळे प्रदूषणात वाढ होऊन मुक्या जनावरांना सुध्दा धोका निर्माण होत आहे. यामुळे शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. आणि व्यावसायिक आणि वितरकांना आपल्याकडील साठवलेला प्लास्टिकचा साठा संपवून दुसरा व्यवसाय करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली होती. तरी सुध्दा शहरातील प्लास्टिकचा साठा अद्यापही संपलेला नाही. उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. एकीकडे पालिका प्रशासन २ टन प्लास्टिक पकडल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र शहरात प्लास्टिकचा वापर सर्रासपणे वापर सुरु आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीenvironmentवातावरण