जनकर यांचा सत्कार
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे माजी मंत्री महादेव जानकर यांचा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी सत्कार केला. यावेळी रासपेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनुदानाची प्रतीक्षा
घनसावंगी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. अनुदानाअभावी निराधारांची गैरसोय होत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
धोकादायक विद्युततारा
जालना : जुना जालना भागातील शास्री मोहल्लासह इतर काही ठिकाणच्या विद्युततारा लोंबकाळत आहेत. लोंबकाळणाऱ्या तारांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधितांनी या तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बंधाऱ्याची दुरुस्ती
विरेगाव : जालना तालुक्यातील विरेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या बंधाऱ्याची दुरुस्ती होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.