शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

गावठी कट्टा; काडतूस जप्त, दोघा जणांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 01:00 IST

रामनगर परिसरातील एका युवकाच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारुन एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील रामनगर परिसरातील एका युवकाच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारुन एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. नीलेश भिकाजी भिंगारे (२८) आणि त्याचा मित्र शेख अकिम शेख रहिम (२८) असे आरोपींचे नावे आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. शुक्रवारी रात्री रामनगर येथील नीलेश भिकाजी भिंगारे याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती रात्री गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानूसार त्यांनी परिसरात सापळा लावून भिंगारे यास ताब्यात घेतले. पिस्तुलाविषयी माहिती विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आपल्याकडे असलेले पिस्तूल आपला मित्र अकिम उर्फ अक्कू शेख रहिम याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना दिली.गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगारे याला सोबत घेऊन अकिब शेख याचा खरपुडी नाका परिसरात शोध घेत असतांना मंठा चौफुली येथून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल आणि खिशात एक जिवंत काडतूस (राऊंड) आढळून आले. दोघांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. ज्ञानेश्वर सानप, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडधे, कृष्णा तंगे, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, अंबादास साबळे, सचिन चौधरी, मदनसिंग बहुरे, हिरामण फलटणकर, विष्णू कोरडे, वैभव खोकले, विकास चेके, मंदा बनसोडे, आशा जायभाये, सूरज साठे आदींनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकCrime Newsगुन्हेगारीjalna-pcजालना