शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:27 IST

ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधीक्षकाचे पद रिक्त झाले असून, या रूग्णालयात अनेक असुविधा असल्यामुळे रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधीक्षकाचे पद रिक्त झाले असून, या रूग्णालयात अनेक असुविधा असल्यामुळे रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शहर व तालुक्यातील सर्वसामान्य व गरीब जनतेला कमी खर्चात रोगनिदान व औषधी उपचार होण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयाची सुरूवात केली. त्यानंतर या रूग्णालयातील विविध विभागांसाठी व डॉक्टर कर्मचा-यांच्या निवासस्थानांसाठी कोटयवधी रूपये खर्च करून स्वतंत्र अशी भव्य इमारत व निवासस्थाने उभारली आहेत. या ग्रामीण रूग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षक, ३ वैद्यकीय अधिकारी, एक सहायक अधीक्षक, दोन कनिष्ठ लिपिक, ७ अधिपरिचारिका,एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ व एक सहायक, एक क्षकिरण तंत्रज्ञ, एक औषध निर्माता, एक शिपाई, चार कक्षसेवक, दोन सफाई कामगार अशी एकुण २५ पदे मंजूर असतांना यापैकी एक वैद्यकिय अधिक्षक,एक कक्षसेवक,एक शिपाई,एक सफाई कामगार अशी चार पदे रिक्त असुन २१ पदे भरलेली आहेत, यातील दोन, चार कर्मचारी वगळता सर्व डॉक्टर व कर्मचा-यांना येथील शासकीय निवासस्थानांचीही सुविधा दिलेली आहे.असे असताना येथे येण्यास कोणीच उत्सुक नसल्याने हे रूग्णालय म्हणजे रेफर रूग्णालय म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.ओपीडीची वेळ वाढविण्याची मागणीसध्या ओपीडीची सकाळी ९ ते १२.३० ते सायंकाळी ४ ते ५ अशी वेळ आहे. मात्र कडक उन्हाळा असल्याने दुपारच्या वेळेत रूग्णांना ग्रामीण रुग्णालयात येण्यास अडचण येते. यामुळे ओपीडीच सकाळची वेळ १२.३० ऐवजी २ वाजेपर्यंत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.अपडाऊन बनले डोकेदुखी४या ग्रामीण रूग्णालयाचे अंतर हे शहरापासून तीन ते चार किलोमीटर दूर आहे. त्यामुळे येथे रूग्णांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच अनेक डॉक्टर हे बदनापूरमध्ये राहत नसल्याने रूग्णांसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज रूग्णांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर