शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सत्संगातून आत्मकल्याणाचा मार्ग - रमेश महाराज कस्तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:24 IST

सुख हे केवळ संतवाणीत असून आत्मकल्याणाचा मार्ग देखील सत्संगातच आहे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : टीव्ही, मोबाईलचा नाद सोडा, त्यात इतकं गुरफटून जाऊ नका. त्यानं काहीही मिळणार नाही. सुख हे केवळ संतवाणीत असून आत्मकल्याणाचा मार्ग देखील सत्संगातच आहे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी येथे बोलताना दिला.अंबड रोडवरील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर परिसरात अखंड शिवनाम सप्ताहातील संगीतमय शिवकथेचे तिसरे पुष्प गुंफताना कस्तुरे महाराज बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मोबाईल, टीव्हीतून काय मिळतं? काही क्षणाची करमणूक करणारी ही साधनं मनुष्य जीवन कधी नष्ट करुन टाकतात हेही कळत नाही. हा नरदेह क्षणभंगुर असल्याने त्याचा उपयोग असा करुन घ्या की, चार- चौघांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. काही मुलं- मुली आणि माणसं देखील मोबाईलमध्ये इतकी गरफटून जातात की त्यांना शेजारी काय चालू आहे हेही कळत नाही. अनेकदा तर रस्त्याने चालतानाही हातातला मोबाईल सुटत नाही. चालता- चालता देखील मोबाईल हाताळतात. अनेक अपघात मोबाईलमुळं होऊ लागली आहेत. मोबाईल हा मानसिक रोगाचं साधन बनला आहे. हजारोंच्या संख्येने माणसोपचार तज्ज्ञांची रुग्णालये खचाखच भरु लागली आहेत. मोबाईलचा चांगला परिणाम किती हे माहीत नाही. परंतु दुष्परिणामाच्या गोष्टी कानावर आल्या की, वाईट वाटते. गृहिणी देखील मोबाईलबरोबरच टीव्हीच्या कार्यक्रमात व्यस्त झालेल्या दिसतात. परंतु हे बरोबर नाही. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की तेथे वाईट घडण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच अनेकदा वाटते की, पूर्वीचा काळ खरंच चांगला होता. राहायला चांगली घरं नव्हती, अंगावर चांगली कापडं नव्हती, नाना प्रकारचे पदार्थ नव्हते, मात्र आनंद आणि प्रेम इतकं होतं की, आप- पर भेदाला छेद देण्याची शक्ती प्रेमात होती.माणूस- माणसाला ओळखत होता. आज मोबाईल- टीव्हीने प्रत्येकात आणि घरातल्या कुटुंबात देखील परकेपणा आणला आहे. कुटुंबातील प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात हे कुठे तरी थांबविण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक