शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट पुरलेले जिवंत अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:18 IST

तालुक्यातील श्रीधर जवळा येथे पुरूष जातीचे अर्भक अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आले. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.

परतूर : तालुक्यातील श्रीधर जवळा येथे पुरूष जातीचे अर्भक अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आले. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.श्रीधर जवळा येथील दौलतराव खरात यांच्या शेतात ऊसतोड करणा-या मजुरांना दुपारी लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. काही महिला आवाजाच्या दिशेन गेल्या असता, त्यांना मातीने भरलेले अर्धवट पुरलेल्या स्थितीत पुरुष जातीचे अर्भक आढळून आले. याबाबत सरपंच वसंतराव राजबिंडे यांना माहिती देण्यात आली. राजबिंंडे यांनी पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक विजय जाधव, कॉन्स्टेबल कांबळे, शाम गायके, महिला कर्मचारी केदारे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अर्भकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी प्रशांत अंभुरे यांनी उपचार करून बाळ ठणठणीत असल्याचे सांगितले. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-----------म्हणून वाचला जीवशेतात सापडलेले अर्भक पुरून टाकण्यासाठीच आणले असावे. मात्र, खड्डा खोदत असताना कुणीतरी आल्याची चाहूल लागल्याने आपला भांडाफोड होईल, म्हणून संशयितांनी अर्धवट पुरलेले अर्भक सोडून पळ काढला. त्यामुळे या बालकाचा जीव वाचला, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.