शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पहाडे महाविद्यालयास विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:52 IST

कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयात रावसाहेब पाटील टोपे स्मृतीनिमित्त विभागीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद येथील माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयास सांघिक विजेतेपद मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयात रावसाहेब पाटील टोपे स्मृतीनिमित्त विभागीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद येथील माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयास सांघिक विजेतेपद मिळाले आहे.या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा मध्यवती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. आर. के. भुतेकर, डॉ. संभाजी पाटील, अनिरुध्द मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेत प्रसार माध्यमे समाजभान निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहेत काय, याविषयावर ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धा पार पडली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडून सोशल मीडिया आणि प्रचलित माध्यमावर सविस्तर विचार व्यक्त केले.स्पर्धेत माणिकचंद पडाडे विधि महाविद्यालयातील कल्याणी काकडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल तिला ५ हजार शंभर रुपये बक्षीस आणि प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील विद्या अंभोरे हिने मिळविला असून, तिला रोख चार हजार शंभर रुपये आणि प्रमाणपत्र तर विजय वाकडे आणि अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचा लक्ष्मण गोडसे यांने तृतीय क्रमांक मिळविला असून, ३ हजार शंभर रुपये परितोषिक देण्यात आले.यावेळी परीक्षक म्हणून बाबासाहेब डोंगरे, आकाश गायकवाड यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. माधव ढेरे, डॉ. व्ही. टी. काळे, डॉ. प्राध्यापक दादासाहेब गजहंस, आर. के. काळे, अतिश तिडके, संदीप खरात, कृष्णा बनसोडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी