शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 12:43 IST

पोलिस असताना चार तरुण आमच्या आंदोलन स्थळी आले, त्यांचा काय उद्देश होता हे पोलीस अधीक्षक यांनी तपासण्याची लक्ष्मण हाके यांची मागणी

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ''जरांगे पाटलाचे चेले वाळूचा धंदा करतात. जरांगेंचा एक समर्थक आहे काळकुटे. तो इथे येऊन आम्हाला धमकी देत आहे. दोन नंबरचे धंदे करणे हाच जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यांचा व्यवसाय आहे'', असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. तसेच आमच्या जीवाला धोका आहे, मध्यरात्री चार तरुण आंदोलनस्थळी हल्ल्याच्या उद्देशाने आले होते, असा दावा करत हाके यांनी त्यांचा काय उद्देश होता हे पोलीस अधीक्षक यांनी तपासावे, अशी मागणी केली. 

ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राजेश टोपे यांच्यावर जोरदार टीका केली. पुढे बोलताना हाके म्हणले, राजेश टोपे हे शरद पवारांचे चेले आहेत टोपे हे सेक्युलरवादी असल्यामुळे ते जरांगे यांना भेटले असल्याचा टोला, हाके यांनी लगावला. तर पृथ्वीराज चव्हाण तुम्ही महाराष्ट्राचे एकदा भ्रमण करा. तुम्ही अनेक प्रतिष्ठित पदे भोगले. मात्र महाराष्ट्रात अनेक ओबीसी लोक आहेत ते कधी तुम्हाला दिसले का? असा सवाल करत राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षातून काढून टाकावे अन्यथा पक्षाचे नुकसान होईल, असा टोला हाके यांनी लगावला.

आजूबाजूला पोलीस सुरक्षा असताना काही तरुण हल्ल्याचा उद्देशाने आमच्याकडे येतात कसे काय? त्यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे. आमच्या अंगावर आला तर आम्ही शिंगावर घेणार, असा इशारा हाके यांनी दिला. तसेच छत्रपती संभाजीराजे भोसले यांना आता आम्ही राजा म्हणणार नाही. त्यांनी कितीही शिव्या दिल्या जीव घेतल्या गोळ्या घातल्या तरी आम्ही आता त्यांना राजा म्हणणार नाही, अशी भूमिका हाके यांनी व्यक्त केली.

नवनाथ वाघमारे यांची राजेश टोपेंवर टीका जरांगे यांचे आंदोलन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी सुरू केले आहे. राजेश टोपे हे शरद पवार साहेबांचे शिष्य आहेत. ओबीसी समाजाला दाबण्यासाठी हा सर्व खटाटप सुरू आहे. राजेश टोपे हे रसद पुरवायला गेले होते. ओबीसी समाजाने आता जागा झाला पाहिजे. मध्यरात्री एकच्या सुमारास काही तरुण आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. तो हल्ला मी परतून लावला.आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाच प्रसाद देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

जरांगे नौटंकीबाज माणूसवडीगोद्रीत पोलिसांवर दबाव सुरू आहे. मुख्यमंत्री आणि शंभुराज देसाई हे दबाव टाकत आहेत. जरांगे उपोषण करत नाही, तर ते निव्वळ नौटंकीबाज माणूस आहेत. समाजाला भावनिक करायचं. आठ दिवसात आठ सलाईन घेतले आहे. जरांगे नाटक कंपनी आहे. तमाशात बताशा म्हणून ते कामाला पाहिजेत, अशी बोचरी टीका वाघमारे यांनी जरांगे यांच्यावर केली.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालना