शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

उजळून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:33 IST

सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी ३५ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी राजूर येथे घडली.

राजूर : सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी ३५ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी राजूर येथे घडली.राजूर येथील शंकर रामभाऊ गुळवे यांचे टेंभूर्णी रस्त्यावर घर आहे. दुपारी त्यांची पत्नी कविता घरी असताना दोन भामटे मोटारसायकलवर आले. त्यांनी कविता यांना तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने उजळून देतो, असे सांगितले. कविता यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून कानातील सोन्याची फुले, गळ्यातील पोत, असे ३५ हजारांचे दागिने काढून दिले. भामट्यांनी सोन्याचे दागिने एका डब्यात ठेवले आणि दुसरा डबा कविता यांच्या हातात दिला. डबा गॅसवर दहा मिनिटे गरम करा, त्यानंतर सोन्याचे दागिने बाहेर काढा, असे सांगितले. दोघे दुचाकीवर निघून गेले. संशय आल्यानंतर कविता यांनी डबा उघडून पाहिला. मात्र, तो रिकामा आढळून आल्याने फसवणूक झाल्याचे कविता यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत दोघे भामटे पसार झाले. कुटुंबियांनी शोध घेऊन ते सापडले नाहीत. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्र्रकरणी शंकर गुळवे यांनी राजूर पोलिसांत तक्रार दिली आहे.