शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा - हर्षवर्धन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:52 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश काढून समाला दिलासा देण्याचे काम करावे, घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये याचा नंतर समावेश करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यायालयात रद्द होणार नाही, अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश काढून समाला दिलासा देण्याचे काम करावे, घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये याचा नंतर समावेश करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यायालयात रद्द होणार नाही, अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.बुधवारी जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या जवळ मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलनास त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांना स्पर्श केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे. असे असताना राजकीय पक्ष हे सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यासाठी आता मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून आरक्षण मिळविण्यासाठी दबाव टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एकूणच त्यांनी यावेळी सरकार आरक्षणा बाबत दिशाभूल करत असल्याचे सांगून, न्यायालय आणि मागास आयोगाकडे बोट दाखवत आहे. यावर उपाय म्हणून अध्यादेश काढून युवकांना हिंमत देण्याचे काम होऊ शकते. असे ते म्हणाले. पूर्वी दिलेली अनेक आश्वासने ही कशी फोल ठरली याची जंत्रीच आ. जाधव यांनी सादर केली. आपण या मुद्यावरून आक्रमक आणि भावनिक असल्याने राजीनामा देण्याचे धाडस केले. तसेच धाडस मराठा समाजाच्या खासदार आणि आमदारांनी दाखवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी शिवप्रहार संघटनेचे पदाधिकारी संजीव भोर यांनी मराठा समाजाच्या युवकांवर हिंसक आंदोलनाचे निमित्त करून जे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा देतानाच नऊ आॅगस्टच्या आंदोलनासाठी गावागावात जाऊन आम्ही हे आंदोलन ऐतिहासिक करणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस संजय लाखे पाटील, भास्कर दानवे, संजय खोतकर, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, प्रशांत वाढेकर, तुळशीदास चंद, राजेंद्र गोरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.लाडू येतील या भ्रमात राहू नयेआजचे सरकार हे आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे, हे जरी मान्य असले तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा नामोल्लेख न करता जाधव यांनी त्यांच्यावरही टीका केली. पंधरा वर्षे सत्तेत असताना आरक्षणा संदर्भात काही केले नसल्याचे सांगून, या आंदोनलाचा फटका हा भाजपला बसणारच आहे, त्यामुळे आपोआपच आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू हा आपल्याकडेच येईल, या भ्रमात कोणी राहू नये असा टोला त्यांनी लगावल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकाला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव