शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांचे आदेश धडकले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:11 IST

होणार होणार म्हणून मागील वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील दोन हजार २७७ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश अखेर गुरुवारी धडकले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : होणार होणार म्हणून मागील वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील दोन हजार २७७ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश अखेर गुरुवारी धडकले. बदली प्रक्रिया प्रथमच आॅनलाइन पद्धतीने थेट राबविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण दिसून आले. बदलीपात्र शिक्षकांना तात्काळ पदभार देण्याचे आदेशात नमूद आहे.शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. जिल्ह्यात मागील वर्षी शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. या वर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शिक्षन विभागाने घेतला. त्यासाठी शिक्षकांना आॅनलाइन अर्जात पसंतीचे वीस गावे निवडण्याचे पर्याय देण्यात आले होते. आॅनलाइन अर्ज करून सहा महिने उलटले तरी बदल्यांचे आदेश निघाले नव्हते. त्यामुळे शिक्षकांमध्ये बदली प्रक्रियेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या महिन्याच्या सुुरुवातीला जिल्ह्यातील २६८ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे आदेश निघाले. त्यानंतर शिक्षकांना जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेशाची प्रतिक्षा होती. गुरुवारी जिल्ह्यातील दोन हजार २७७ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाल्याची माहिती मिळताच शिक्षकांनी गटसाधन केंद्रात गर्दी केल्याचे दिसून आले. एकाच शाळेवर कार्यरत शिक्षकांनी एकमेकांना संपर्क करून कुठे बदली झाली याबाबत विचारपूस केली.जिल्ह्यातील २१७ शिक्षक विस्थापित झाले आहेत. या वर्षी बदली प्रक्रिया प्रथमच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आल्यामुळे यात कुणालाही हस्तक्षेप करता आला नाही. त्यामुळे शिक्षक बदल्यांसाठी केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाला आळा बसला. याबाबत अनेक शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. बदलीपात्र शिक्षकांना तात्काळ बदली झालेल्या शाळेवर जाऊन कार्यभार स्वीकारण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याचे उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकJalna z pजालना जिल्हा परिषद