शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर हाच आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:49 IST

मंदिर हाच आपल्या आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालाजी मंदिर संस्थानने प्रसादालय उभारण्याचा हाती घेतलेला संकल्प हा ऐतिहासिक क्षण आहे. कष्ट आणि संयमातून कोणत्याही चांगल्या गोष्टीला आकार येत असतो, आणि हिंदू संस्कृतीला सर्वश्रेष्ठ संस्कृती मानले गेले आहे. त्याचे कारण देखील हेच आहे. म्हणूनच मंदिर हाच आपल्या आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.जुना जालना भागातील कचेरी रोडवरील बालाजी मंदिरात भक्तांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या प्रसादालयाचे भूमिपूजन जाफराबाद येथील नवनाथ संस्थानचे प. पू. भास्करराव महाराज देशपांडे (भाऊ) यांच्या हस्ते आणि ब्रह्मवृंदांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी वे.शा.सं. शेष महाराज गोंदीकर, प. पू. रामदास महाराज आचार्य, ह.भ.प. नाना महाराज पोखरीकर, ह.भ.प. प्राचार्य दीनानंद महाराज पाठक, प. पू. विवेक महाराज जोगवडकर, वे. शा. सं. रवि महाराज जहागीरदार, वे. शा. सं. विनायक महाराज फुलंब्रीकर यांच्यासह माजी आ. अरविंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी नगराध्यक्ष विलास नाईक, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याण देशपांडे, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुधाकर लोखंडे, प्रा. एस. व्ही. देशपांडे, किरण गरड, अ‍ॅड. बलवंत नाईक, गुजराती समाजाचे अध्यक्ष अमित कसारी, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, गणेश सुपारकर, चंद्रप्रकाश शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी खोतकर म्हणाले की, या संस्थानच्या विश्वस्तांनी अत्यंत कष्ट आणि संयमातून या मंदिराची उभारणी केल्यानंतर प्रसादालयाचे काम देखील हाती घेतले आहे. या संस्थानकडून खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य होत असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देशपांडे यांनी केले.भास्कर महाराज यांचे मार्गदर्शनया प्रसंगी प. पू. भास्कर महाराज देशपांडे म्हणाले की, देणाºयाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ! या कार्याला देखील आपण स्वत: शक्य ती मदत करणार असून, प्रत्येकानेच ती केली तर प्रसादलयाचे कार्य सिध्दीस जाईल असे ते म्हणाले.जिथे अन्नपूर्णा वास करते त्या ठिकाणी देणाऱ्यांची उणीव भासत नाही. या सत्कार्याला निश्चितच सर्वांचेच सहकार्य लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे