शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मर्जीतील इंग्रजी शाळांवरच शिक्षण विभाग मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:46 IST

राज्य सरकारकडून इंग्रजी शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम देण्यात येते. ही रक्कम वाटप करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भेदभाव केला असून, मर्जीतील शाळांनाच त्याचे वाटप केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इंग्रजी शाळांमध्ये समाजातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण अधिनियम २००९ अंतर्गत आरटीई अंतर्गत प्रवेश द्यावेत असे निर्देश आहेत. त्यानुसार इंग्रजी शाळांनी ते प्रवेश दिलेही आहेत. परंतु हे प्रवेश दिल्यावर राज्य सरकारकडून इंग्रजी शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम देण्यात येते. ही रक्कम वाटप करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भेदभाव केला असून, मर्जीतील शाळांनाच त्याचे वाटप केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.जालना जिल्ह्यातील अनेक इंग्रजी शाळाचालकांनी राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. मात्र, शासनाकडून जो प्रतिपूर्तीचा निधी मंजूर झाल्यावर तो जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. मात्र, हा निधी वाटप करताना शिक्षण विभागाने मर्जीतील शाळांनाच तो वाटप केल्याने अन्य इंग्रजी शाळा चालकांवर अन्याय झाला आहे.या संदर्भात मेस्टा संघटनेने शिक्षणाधिकारी पी.एल. कवाने यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागाने जो भेदभाव केला आहे, तो रद्द करून सर्वांना सारखे अनुदान द्यावे, २५ टक्के मोफत प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि शालेय पोषण आहार देण्यात यावा , शाळांना विद्युत बिल माफक दरात आकारण्यात यावे. या मागण्यांचाही निवेदनात समोवश होता.एप्रिल पूर्वी प्रतिपूर्तीची रक्कम देण्यात आल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हे निवेदन देताना मेस्टा मराठवाडा उपाध्यक्ष सचिन जाधव, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, उपाध्यक्ष राजू तारे, जिल्हाध्यक्ष (म.) के.जी. वाळके, रवींद्र दाणी, डॉ. सावंत, संजय चव्हाण, अ‍ॅड. मदन, प्रमोद आर्सूड, देशमुख, ज्ञानेश्वर घुगे, जाधव, सुलताने, ज्ञानेश्वर बरबडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी