शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

कर्जमुक्तीत एक लाख ३० हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:45 IST

शनिवारी प्रसिध्द झालेल्या दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे दोन याद्यांमध्ये प्रसिध्द झाली आहेत. शनिवारी प्रसिध्द झालेल्या दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर शनिवारी दुपारपर्यंत १७०० हून अधिक शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करून कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे.महाआघाडी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत ज्या शेतक-यांचे बँक कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत. त्या शेतक-यांचे आधार क्रमांक संलग्निकरण करून घेण्यात आले. त्यानंतर शासनाच्या कर्जमुक्ती पोर्टलवर १ लाख ८१ हजार शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली होती. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक टप्प्यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ शेतक-यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली होती.शनिवारी २९ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या दुस-या यादीत जालना जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांचा समावेश करण्यात आला आहे. यात अंबड तालुक्यातील १३७ गावातील १९ हजार २९९, बदनापूर तालुक्यातील ९० गावातील १२ हजार ३५१ शेतकरी, भोकरदन तालुक्यातील १५२ गावातील २३ हजार ९८० शेतकरी, घनसावंगी तालुक्यातील ११४ गावातील १६ हजार ७२ शेतकरी, जाफराबाद तालुक्यातील १०३ गावातील १५ हजार ६४८ शेतकरी, जालना तालुक्यातील १४३ गावातील १९ हजार ४४३ शेतकरी, मंठा तालुक्यातील ११२ गावांमधील १० हजार ०६ शेतकरी तर परतूर तालुक्यातील ९७ गावातील १३ हजार ३५९ शेतक-यांचा या दोन्ही यादीत समावेश करण्यात आला आहे. कर्जमुक्तीच्या दोन्ही याद्यांमध्ये जालना जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १५८ शेतक-यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. याद्या गावस्तरावर प्रसिध्द झाल्यानंतर शेतक-यांनी आधार प्रमाणिकरणासाठी आपलं सरकार केंद्रावर एकच गर्दी केली होती.कर्जमुक्तीची दुसरी यादी शनिवारी प्रसिध्द करण्यात आली. या यादीत आपले नाव आल्याचे समजताच गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथील गंगूबाई भगवान जोशी या शेतकरी महिलेने आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला. या योजनेंतर्गत त्यांचे ७१ हजार ९२ रूपयांचे कर्ज माफ झाले आहे.१११३ केंद्रावर प्रक्रियाकर्जमुक्तीच्या याद्या प्रसिध्द केल्यानंतर जिल्ह्यातील १११३ आपलं सरकार केंद्रावर शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करून घेतले जात आहे. आधार प्रमाणिकरणासाठी जाताना शेतक-यांनी यादीत आपल्या आपल्या नावासमोर आलेला विशिष्ट क्रमांक, आपले बँकेतील कर्ज खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईल सोबत नेणे गरजेचे आहे.आधार क्रमांकाच्या ३६ तक्रारीकर्जमाफीच्या पहिल्या यादीत आधार क्रमांक चुकल्याबाबत ३६ आॅनलाईन तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. पैकी ५ तक्रारींचे निरसण करण्यात आले आहे. तर ४ तक्रारी जिल्हा समितीकडे प्रलंबित आहेत. तर २७ तक्रारी तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. यात बदनापूर तालुक्यात ३, भोकरदन २, घनसावंगी १५, जाफराबाद ५, जालना व परतूर तालुक्यातून प्रत्येकी १ अशा एकूण २७ तक्रारी आहेत. एकूण ३१ तक्रारींचा निपटारा होणे बाकी आहे.पाच कोटी कर्जखात्यात वर्गटेंभुर्णी व तीर्थपुरी येथील लाभार्थी शेतक-यांची यादी प्रथम प्रसिध्द झाली होती. या दोन गावातील ६९५ शेतक-यांच्या कर्ज खात्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४ कोटी ९७ लाख २२ हजार ४९६ रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी