जालना : तब्बल दीड वर्षापासून शहरातील पथदिवे बंद असूनही पालिकेस त्याचे काहीही सोयर-सुतक दिसत नाही. १४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे कारण दाखवत महावितरण कंपनीने पथदिव्यांची जोडणी कायमची तोडली होती. दोन-तीन महिन्यांपूर्वी पालिकेच्या वतीने थकबाकीपोटीचा धनादेश दिला. त्यानंतर महावितरणच्या वतीने वीज जोडणी पूर्ववत करण्यात आली. परंतु दीड वर्षापासून बंद असलेले पथदिवे आता दुरूस्तीचे काम पुढे करीत बंदच आहे. दरम्यान पालिकेचे वीज बिलापोटी कोट्यवधी रुपये थकित होते तर दुसरीकडे मालमत्ता कराचे लाखो रूपये महावितरणकडे थकले होते. त्यामुळे वीजबिल आणि कर देण्यातच दोन्ही कार्यालयांमध्ये चांगलीच जुंपली होती. या कालावधीत नागरिकांनीही पथदिव्यांसाठी आपले अस्तित्व दाखविले नाही़ तब्बल दीड वर्षापासून पथदिवे बंद असल्याने शहरात चोर्यांचे सत्र सुरू आहे़ पोलिसांची गस्त असूनही काहीच उपयोग होत नाही. दुकाने फोडण्याचे तसेच घरफोडीचे प्रकार वाढले आहेत़ सध्या चोर्यांमुळे जालनेकर त्रस्त आहेत़ पोलिसांनी पालिकेला पथदिवे सुरू करण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला आहे़ शासनाच्या विविध अनुदानातून प्राप्त होणार्या रकमेतून वीज कंपनीचा हप्ता भरून वीज पुरवठा सुरळीत वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. मात्र दोन-तीन महिने उलटूनही शहरातील अनेक भागाचे पथदिवे बंदच आहेत. वीजबिल भरल्यानंतर काही दिवस जुना जालना भागातील तसेच नवीन जालना भागातील पथदिवे उजळले खरे परंतु आता हे बंदच आहेत. शहरातील सर्वच भागात पथदिवे बंद असल्याने रात्रीचे शहराून फिरणे जिकिरीचे बनले आहे़ पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील पथदिवे बंद आहेत़ पथदिवे सुरु होणार की नाहीत असा सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे़ (प्रतिनिधी) १.८५ कोटी भरले सुमारे १४.५० कोटींच्या थकित देयकापोटी ९ जानेवारी २०१३ पासून शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने बंद केला होता. त्यानंतर पालिकेने १.८५ कोटींची रक्कम देयकापोटी भरली. रक्कम भरूनही दोन-तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, शहरातील पथदिवे बंदच आहे. त्यामुळे नागरिक अंधारातच चाचपडताहेत
दीड वर्षांपासून पथदिव्यांचे भिजत घोंगडे
By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST