शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:06 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा समजला जातो. महसूल विभागात काम करीत असताना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.महसूल दिनानिमित्त गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार, महसूल संघटनेचे व्ही.डी. म्हस्के, भोजने, महेश सुधाळकर, राजू निहाळ, पी. बी. मते, संजय चंदन, गोरे, वैजनाथ घुगले, व्ही. के. आडे आदींची उपस्थितीहोती.पुढे बोलताना बिनवडे म्हणाले की, महसूल प्रशासनाकडे विश्वासाने पाहिले जाते. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचा-यांने कुठल्याही दबावाला बळी न पडता आत्मविश्वासाने व अभ्यासू वृत्तीने काम करण्याची गरज असून, प्रत्येक अधिकारी, कर्मचा-याने आपल्या वर्षभराच्या कामाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना करत महसूल विभागाचे काम अधिक जलदगतीने व अचूक होण्याच्या दृष्टीकोनातून होण्यासाठी येणाºया काळात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महसूल प्रशासनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी केशव नेटके, शिवकुमार स्वामी, ब्रिजेश पाटील, तहसीलदार राजाभाऊ कदम, महेश सुधाळकर, मनीषा मेने, सुमन मोरे, गौरव खैरनार, नायब तहसीलदार मयुरा पेरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच दहावी व बारावीत विशेष प्राविण्य मिळवलेल्या महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांच्या पाल्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मोरे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार स्नेहा कुहिरे यांनी मानले. कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाcollectorजिल्हाधिकारी