शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पंटरच्या ‘लोकेशन’विरुध्द अधिकाऱ्यांचा गनिमी कावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:27 IST

अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार मनीषा मेने यांनी पंटरच्या ‘लोकेशन’ पद्धतीला गनिमी काव्याने उत्तर देत कारवाई मोहीम राबविली आहे.

रवी गात ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलचालींवर पंटरमार्फत लक्ष ठेवून ‘लोकेशन’ मिळविणा-या वाळू तस्करांना अधिका-यांनी कारवाईचे चांगलेच झटके दिले आहेत. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार मनीषा मेने यांनी पंटरच्या ‘लोकेशन’ पद्धतीला गनिमी काव्याने उत्तर देत कारवाई मोहीम राबविली आहे. आठवडाभरात २२ वाहनांवर कारवाई करून ३५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळण्याचा चंग महसूल प्रशासनाने बांधला असून, उपविभागीय अधिकारी हदगल, तहसीलदार मेने यांनी कारवाईचे सत्र जोरात राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांनी चक्क पंटरमार्फत त्यांच्या दैनंदिन हलचालींवर लक्ष ठेवून ‘लोकेशन’ मिळविण्यास सुरूवात केली. ‘लोकेशन’ मिळाल्यानंतर अवैध वाळूची वाहतूक केली जात होती. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल एका शासकीय प्रकरणाच्या सुनावणीसाठी गुरुवारी शासकीय वाहनाने औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात गेले होते. हदगल उच्च न्यायालयात असल्याची माहिती वाळू तस्करांना ‘लोकेशन’व्दारे मिळाली. हे पंटर उच्च न्यायालय परिसरात हदगल यांच्या शासकीय वाहनावर नजर ठेवून मोबाईलव्दारे गोदापात्रातील सहका-यांना माहिती देत होते.न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर हदगल हे पार्किंगकडे न जाता बाजूच्या गेटने बाहेर पडले आणि रिक्षात बसून सिडको बसस्थानकाकडे रवाना झाले. हदगल यांनी मोबाईलव्दारे आपल्या सहकाºयांना सिडको बसस्थानकाकडे बोलावून घेतले. हदगल हे सहका-यांसमवेत बीडला जाणा-या बसमध्ये बसले. स्वत: उपविभागीय अधिकारी बसमध्ये बसल्यामुळे ‘आपण कोठे जात आहोत?’ हे विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही. दुसरीकडे हदगल अद्यापही औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात असल्याची माहिती त्यांच्या शासकीय वाहनावर नजर ठेवून असणारे पंटर सहका-यांना देत होते. या माहितीवर अवलंबून वाळू तस्करांनी वाळूने भरलेली वाहने गोदापात्रातून औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आणून औरंगाबादकडे रवाना केली. हदगल यांनी अगोदरच गेवराई येथे पाठविलेल्या शासकीय कर्मचाºयास मोबाईलव्दारे संपर्क करुन खाजगी वाहन किरायाने घेतले. या वाहनाने हदगल व त्यांचे पथक पुन्हा औरंगाबादकडे रवाना झाले. या पथकाने शहागड, पाथरवाला फाटा, वडीगोद्री, जामखेड फाटा इ. विविध ठिकाणी वाळू तस्करी करणा-या वाहनांवर धाडी टाकल्या. महत्त्वाचे म्हणजे सर्वच वाळूतस्करांचे लक्ष औरंगाबादकडे लागलेले होते. त्यामुळे आपल्या पाठीमागून पथक येईल, असा विचारही या वाळू तस्करांच्या मनात आला नव्हता. महसूलच्या अधिका-यांनी पंटरच्या ‘लोकेशन’ला गनिमी काव्याने उत्तर देत वाळू तस्करांवर कारवाई केल्याने माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.दबावतंत्राचा प्रयत्नवाळू तस्करांविरूध्द धडक कारवाई करणा-या दोन्ही अधिका-यांविरूध्द राजकीय दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न झाला. मात्र, राजकीय दबावतंत्राला झुगारून या अधिका-यांनी वाळू तस्करांविरूध्द धडक कारवाई केली आहे.तहसीलदार मेने यांचीही कारवाईअशाच प्रकारची कारवाई तहसीलदार मनीषा मेने यांनीही केली. पंटर चोवीस तास आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात याचा अनुभव मेने यांना आला होता. मेने यांनी मागील आठवड्यात पहाटेच्या सुमारास पथकातील सर्व अधिकारी, कर्मचाºयांना शासकीय तंत्रनिकेतनजवळ तयार राहण्यास सांगितले. मेने यांनी पहाटे खाजगी वाहन किरायाने घेतले. त्यानंतर जामखेड फाटा येथे दबा धरुन बेसावधपणे वाळूतस्करी करणा-या वाहनांवर पथकाने झडप घातली.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभाग