शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:30 IST

बॅनरबाजी करणाऱ्या आमदार सोळुंके, पंडित यांनी राजीनामा देऊन जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हावं

वडीगोद्री (जि. जालना) :आमदार प्रकाश सोळुंके, विजयसिंह पंडित यांनी राजीनामा देऊन जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंडल यात्रेवरही टीका केली.

गेवराई येथे झालेल्या राड्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोमवारी रात्री वडीगोद्री येथे माध्यमांशी संवाद साधला. गेवराई तालुक्याच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गेवराईमध्ये माझा पुतळा जळला. तुम्ही चौकाचौकात बॅनर लावता हे आमदारला शोभणार कृत्य आहे का? प्रकाश सोळुंके, विजयसिंह पंडित यांनी राजीनामा देऊन जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं. तुम्ही आम्हाला भटके कुत्रे म्हणता. अजित पवार नावाचा जातीवादी उपमुख्यमंत्री या प्रश्नावर बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री ओबीसी आमचा डीएनए आहे म्हणतात. परंतु, २० महामंडळे तयार केली. त्यावर अध्यक्ष नियुक्त केले नाहीत आणि महामंडळाला निधीही उपलब्ध करून दिला नाही, असेही हाके म्हणाले.

वडीगोद्रीत बंदोबस्त वाढविलागेवराईच्या राड्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे आले होते. या ठिकाणी ओबीसी बांधव जमा झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तातडीने या भागात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. वडीगोद्री गावातही गस्त लावण्यात आली आहे.

ओबीसी रस्त्यावर उतरतीलजरांगे मुंबईला जात असतील, तर त्याला रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. ओबीसी आरक्षण वाचायचे असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल. जरांगे यांना रिझर्व्हेशनचे स्पेलिंग लिहिता येत नाही, अशी टीकाही हाके यांनी केली.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालना