शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या पुतळ्याखाली बसून अर्वाच भाषेत ओबीसी कधीही बोलत नाही; हाकेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:19 IST

मंडलस्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेला सुरूवात.

वडीगोद्री ( जालना) : काही नेत्यांच्या आदेशावरून काम करत असलेल्या मनोज जरांगे यांनी समाजात फूट पाडण्याचा उद्योग बंद करावा, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आज केली. तसेच महापुरुषांच्या पुतळ्याखाली बसून अर्वाच भाषेत कधीही ओबीसी बोलत नाही. जरांगे कोणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत आहेत, असा सवालही हाके यांनी जरांगे यांना ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेच्या सुरुवात प्रसंगी केला. 

अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील मंडलस्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेला आज दुपारी सुरूवात करण्यात आली. या दरम्यान डोणगाव, टाका रामगव्हाण, वडीगोद्री, गहीनीनाथनगर या ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करत हाके आणि वाघमारे यांचे औक्षण करण्यात आले. जरांगे पुढे म्हणाले, राज्यात कुणबीच्या लाखों बोगस नोंदी झाल्या आहेत. एका व्यक्तीला एकच आरक्षण घेता येते, पण महाराष्ट्रात एक व्यक्ती तीन तीन आरक्षणाचा लाभ कसा घेऊ शकते, असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.

एकाच जातीला हजारो कोटी ओबीसींचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जनआक्रोश यात्रा सूरू केली. सरकार एका जातीसाठी साडेचार हजार कोटी व्याज भरत आहे, तुमच्या घरातून पैसे आणले का? तुम्हाला कोणी अधिकार दिला एवढे पैसे एका जातीला देण्याचा असा सवाल, हाके यांनी सरकारला केला. शासनकर्ती जमात मागास कशी असू शकते, मराठा समाज जर मागास असेल तर पुढारलेला समाज कोणता? हे या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं, असेही हाके म्हणाले.

सर्व राजकारण्यांनी बोलावेआम्ही ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय. धनगर ओबीसी आरक्षणाच्या बाहेर आहे हे सांगितलं जातंय, फोडा आणि झोडा ही त्यांची नीती आहे. ओबीसीने कधीही कायदा हातात घेतला नाही. ओबीसींच्या आरक्षणावर शरद पवार मौन बाळगून आहेत. सर्व राजकारण्यांनी पुढे येऊन बोलल पाहिजे, असे आवाहन हाके यांनी केले.

जरांगे राज्य सरकारचे लाडके, नवनाथ वाघमारे यांची टीका जरांगे यांनी आंदोलन केल्यापासून जातीय सलोखा बिघडला आहे. राज्य सरकार तर जरांगेचे लाड करत आहे. जरांगे पाटील यांनी राजकारणात आलं पाहिजे. त्यानंतर त्यांना कोणाला पाडायचं त्यांना पाडून दाखवलंच पाहिजे असे आव्हान वाघमारे यांनी केले.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेJalanaजालनाOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील