शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुळ्या भावांमुळे निवडणूक आयोग बुचकळ्यात;मतदान यादीतील सारख्याच फोटोंमुळे दिली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 17:34 IST

सारखीच दिसत असल्याने जुळ्यांची पंचाईत; मतदानाच्या सर्वोच्च अधिकारापासून राहू शकतात वंचित

- फकीर देशमुख

भोकरदन ( जालना ) : जुळे असल्याने नैसर्गिकरीत्या एक सारखे दिसत असल्याने दोन जुळ्या भावांना मतदानाच्या सर्वोच्च अधिकारापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदान यादीत सारखेच फोटो असल्याने निवडणूक विभागाने एकाचे नाव कमी करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. 

सध्या निवडणूक विभागाच्यावतीने मतदान याद्या अद्यावत करणे सुरु आहे. यात एकापेक्षा जास्त वेळा नाव, नावातील दुरुस्ती अशी कामे सुरु आहेत. एका पेक्षा जास्त ठिकाणच्या यादीत नाव असल्यास एकाच ठिकाणी नाव ठेवून बाकीच्या ठिकाणची नावे कमी करण्यात येत आहे. यासाठी मतदारास आधी नोटीस देण्यात येते. अशीच नोटीस भोकरदन शहरातील रोकडा हनुमान मंदिर परिसरातील दोन भावांना आली आहे. येथील भाग क्रमांक 186 च्या मतदार यादीत अनुक्रमांक 186 वर उत्तम कोंडीबा सपकाळ यांचे नाव व फोटो आहे तर अनुक्रमांक 987 वर दत्तू कोंडीबा सपकाळ यांचा नाव व फोटो आहे. हे दोघे जुळे असल्याने चेहऱ्यात साम्य आहे. दत्तू सपकाळ व उत्तम सपकाळ हे दोन्ही मतदार वेगवेगळे आहेत. परंतु त्यांना केवळ चेहरा साधर्म्य असल्याने नाव कमी करण्याची नोटीस आली आहे. 

आणखी एक प्रकरण त्याचप्रमाणे भाग क्रमांक 186 मध्ये गजानन कोंडीबा सपकाळ यांचे 984 क्रमांकावर नाव व फोटो  आहे, मात्र त्यांच्या फोटो सारखाच एक फोटो सलीम नूर सय्यद रा धावडा यांचा आहे. त्यामुळे त्यांना सुध्दा एक नाव कमी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. वास्तविक एक मतदार हा धावडा येथील तर दुसरा मतदार हा भोकरदन शहरातील आहे.

बीएलओ कडून शोधनिवडणूक विभागाने या भागासाठी नेमणूक केलेले बीएलओ शेख लालू सर यांनी सांगितले की, या दोघांची भेट घेऊन नोटीस दिली आहे. हे दोघे संख्ये जुळे भाऊ आहेत. मी त्यांची भेट घेतली. मात्र, मला ही कोणता दत्तू व कोणता उत्तान हे ओळखता आले नाही. त्यांनी आमचे दोघांचे ही नावे मतदार यादीत असावीत अशी मागणी केली. त्यांची फोटो तहसील कार्यालयात जमा करणार आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगJalanaजालना