शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

चक्क मृताच्या नावाने नोटरी...! फसवणूक : वकील पिता- पुत्राविरुद्ध भोकरदन पोलिसात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 03:55 IST

प्लॉट विक्रीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने बनावट नोटरी करून फसवणूक करणा-या वकील पिता-पुत्रांवर शनिवारी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकास पोलिसांनी अटक केली असून

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन (जि. जालना): प्लॉट विक्रीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने बनावट नोटरी करून फसवणूक करणा-या वकील पिता-पुत्रांवर शनिवारी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकास पोलिसांनी अटक केली असून, दुसरा फरार झाला आहे.याबाबत बाबासाहेब पगारे (रा. नळणी) यांनी फिर्याद दिली आहे. अ‍ॅड. राहुल शिंदे व त्याचे वडील अ‍ॅड. अशोक शिंदे (रा. भोकरदन) यांनी आपणास वालसा डावरगाव व बेलोरा शिवारात दोन प्लॉट विक्रीसाठी असून, तुम्हाला प्लॉट खरेदी करायचे आहेत काय, अशी विचारणा केली.१२ आॅक्टोबर २०१७ रोजी राहुल शिंदे यांनी राजू भागाजी कराळे यांचा ६४० चौरस फुटांचा ४० हजार रुपये किमतीचा व अंकुश बाजीराव कोल्हे (रा़ बेलोरा) यांचा ८७५ चौरस फुटांचा प्लॉट ३० हजार रुपयांत मिळवून देतो, असे सांगितले. तेव्हा त्यांनी दोन्ही प्लॉटचे एकत्रित पाच हजार रुपये कमी करण्याचे सांगितले. २० हजार रुपये आगाऊ म्हणून राहुल शिंदे यांच्याकडे दिले गेले. त्यानंतर प्लॉटबाबत खात्री करण्यासाठी १३ आॅक्टोबर रोजी वालसा डावरगाव व बेलोरा येथे गेलो असता, नोटरीच्या आधारे ज्यांच्या नावाचा प्लॉट आहे, त्या दोन्ही व्यक्ती मृत झाल्याचे गावकºयांनी सांगितले.एकास अटक; दुसरा फरारग्रामपंचायतीमध्ये जाऊन खात्री केली असता, ज्यांच्या नावे प्लॉट दाखविला होता, त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयाने दिले, तसेच प्लॉटचे मूळ मालक शेषराव सिरसाठ व माणिक मोरे या दोघांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचीही माहिती दिली. त्याचप्रमाणे प्लॉटची नोटरी केलेली कागदपत्रे बोगस असल्याचे सांगितले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पगारे यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात जाऊन अ‍ॅड. राहुल शिंदे व अ‍ॅड. अशोक शिंंदे यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार दिली.पोलिसांनी अ‍ॅड. राहुल शिंदे यांना अटक करून, १४ आॅक्टोबरला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. अ‍ॅड. अशोक शिंदे हे फरार आहेत़ पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सांखळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा